lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > राज्याचे कापूस उत्पादन घटणार, कॉटन असोसिएशनचा अंदाज

राज्याचे कापूस उत्पादन घटणार, कॉटन असोसिएशनचा अंदाज

देशभरातील उत्पादनात ६ टक्के वाढीचा अंदाज असताना राज्यातील कापूस उत्पादनात ६.८१ टक्के घट होत आहे. कापूस उत्पादनात गुजरात महाराष्ट्राला मागे टाकत मोठी बाजी मारेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने व्यक्त केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:37 AM2018-05-10T00:37:03+5:302018-05-10T00:37:03+5:30

देशभरातील उत्पादनात ६ टक्के वाढीचा अंदाज असताना राज्यातील कापूस उत्पादनात ६.८१ टक्के घट होत आहे. कापूस उत्पादनात गुजरात महाराष्ट्राला मागे टाकत मोठी बाजी मारेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने व्यक्त केला आहे.

The state's cotton production is expected to decline | राज्याचे कापूस उत्पादन घटणार, कॉटन असोसिएशनचा अंदाज

राज्याचे कापूस उत्पादन घटणार, कॉटन असोसिएशनचा अंदाज

मुंबई - देशभरातील उत्पादनात ६ टक्के वाढीचा अंदाज असताना राज्यातील कापूस उत्पादनात ६.८१ टक्के घट होत आहे. कापूस उत्पादनात गुजरात महाराष्ट्राला मागे टाकत मोठी बाजी मारेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने व्यक्त केला आहे.
मागील वर्षी सर्वाधिक ८९ लाख गाठी (१५.१३ लाख टन) कापसाचे उत्पादन गुजरातमध्ये झाले होते, तर महाराष्ट्रात ८८ लाख गाठी (१४.९६ लाख टन) कापूस उत्पादन झाले. यंदा राज्यात घट व गुजरातमध्ये वाढ अपेक्षित आहे.
देशभरात पिकवल्या जाणाऱ्या कापसासाठी आॅक्टोबर ते सप्टेंबर असे वर्ष ग्राह्य धरले जाते. या वर्षातील ८६ टक्के कापूस बाजारात आहे. सप्टेंबर २०१८पर्यंतचा विचार केल्यास महाराष्ट्रात ८२ लाख गाठी कापसाच्या उत्पादनाचा अंदाज आहे. गुजरातमध्ये तब्बल १०५ लाख गाठी कापूस उत्पादन अपेक्षित आहे. प्रति गाठ १७० किलोनुसार देशात ३६० लाख गाठी (६१.२० लाख टन) कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. मागील वर्षी उत्पादन ३३७.२५ लाख गाठी (५७.३३ लाख टन) होते.

६१ लाख गाठींची निर्यात
देशातून ६१ लाख गाठींची निर्यात झाली आहे. जुना कापूस धरून सध्या ३४७ लाख गाठी कापूस उपलब्ध आहे.
त्यापैकी ३११ लाख गाठी बाजारात आल्या असून, ६ लाख गाठी आयात केल्या आहेत. देशांतर्गत कापसाचा वापर १८९ लाख गाठी (३२.१३ लाख टन) आहे.

मागील वर्षी सर्वाधिक ८९ लाख गाठी

२ लाख गाठींची वाढ : महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात घट होत असली तरी आधीच्या अंदाजापेक्षा वाढ झाली आहे. महाराष्ट्रात ८० लाख गाठींचा अंदाज असताना २ लाख अधिक गाठी उत्पादन झाले आहे. तेलंगणा व आंध्र प्रदेशातून दीड लाख गाठी कमी कापूस आला.
- अतुल गणात्रा, अध्यक्ष, कॉटन असोसिएशन आॅफ इंडिया

Web Title: The state's cotton production is expected to decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.