Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोयाबीन तेल महागणार, मागणी-उत्पादनातील दरी रुंदावली

सोयाबीन तेल महागणार, मागणी-उत्पादनातील दरी रुंदावली

वाढती मागणी, उत्पादन वाढीचा कमी वेग व अधिक आयात अशा कचाट्यात सध्या भारतीय सोयाबीन तेल क्षेत्र अडकले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:30 PM2018-07-16T23:30:12+5:302018-07-16T23:33:00+5:30

वाढती मागणी, उत्पादन वाढीचा कमी वेग व अधिक आयात अशा कचाट्यात सध्या भारतीय सोयाबीन तेल क्षेत्र अडकले आहे.

Soybean oil will be depleted, demand will be widened | सोयाबीन तेल महागणार, मागणी-उत्पादनातील दरी रुंदावली

सोयाबीन तेल महागणार, मागणी-उत्पादनातील दरी रुंदावली

- चिन्मय काळे 
मुंबई : वाढती मागणी, उत्पादन वाढीचा कमी वेग व अधिक आयात अशा कचाट्यात सध्या भारतीय सोयाबीन तेल क्षेत्र अडकले आहे. त्यातच केंद्र सरकारने सोयाबीन तेलबियांवरील आयात शुल्कात वाढ केली. त्यामुळे आता मोठी मागणी असलेले सोयाबीनचे तेल महागण्याची शक्यता आहे.
सरसू व जवसाचे उत्पादन कमी होत गेल्याने या दोन्ही तेलांची जागा आधी पाम व नंतर सोयाबीन तेलाने घेतली. अनेक शेतकऱ्यांनीही सोयाबीनचे पीक घेण्यास सुरुवात केली. मागील दहा वर्षात देशातील सोयाबीनचे उत्पादन दीड पटीने वाढले खरे पण त्या तुलनेत तेलाची मागणी चारपटीने वाढली आहे. यामुळे तेलबियांची आयात वाढवावी लागली आहे. महाराष्टÑ खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितले की, सध्या भारतात पाम तेलापाठोपाठ सोयाबीन तेल अन्य सर्व तेलांना मागे टाकत दुसºया स्थानी आहे. मागील दहा वर्षात सोयाबीन तेलाची मागणी सूर्यफुलाच्या तेलापेक्षाही वाढली आहे. तर शेंगदाणा, तीळ, मोहरी या तेलांची मागणी अत्यल्प आहे. मध्यप्रदेश व विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतात. पण ते पुरेसे नाही. त्यामुळेच आज भारताला ६५ टक्के सोया तेलबिया आयात कराव्या लागत आहेत. या क्षेत्रात सध्या चीन अव्वल असला तरी मागणी अशीच राहील्यास पुढील दहा वर्षात भारत आयातीत अव्वल होईल.
तेलबियांवर आतापर्यंत ३० टक्के आयात शुल्क होते. स्वदेशी उत्पादनाला चांगली किंमत मिळण्यासाठी केंद्र सरकारने हे शुल्क ४० टक्के केले. यामुळे आता सोयाबीन तेल लिटरमागे १२ रुपयांपर्यंत महाग होत आहे. मुळात देशांतर्गत सोयाबीनचे उत्पादन पुरेसे नसताना आयात शुल्क वाढविण्याची गरजच नव्हती, असे ठक्कर यांचे म्हणणे आहे.
>सोयाबिनमध्ये ८२ टक्के पेंढ : सोयाबिनमध्ये फक्त १८ टक्के तेल असते. उर्वरित ८२ टक्के ही केवळ पेंढ असते. त्यामुळे सोयाबिन डाळीचे किंवा तेलबियांचे उत्पादन अधिक असले तरी प्रत्यक्ष तेलाचे उत्पादन कमीच असते. त्यातूनच तेलबियांची आयात वाढत आहे.
>सोयाबीन व तेलबियांचे चित्र
उत्पादन १.२० कोटी टन
देशांतर्गत सोयाबीन व तेलबियांचे चित्र
प्रत्यक्ष तेलाचे उत्पादन : १५ लाख टन
तेलबियांचे उत्पादन ९० लाख टन

Web Title: Soybean oil will be depleted, demand will be widened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.