Lokmat Money > बिझनेस न्यूज > लवकरच भारतीय अर्थव्यवस्था चीनवर करणार मात, 2018 वर्ष ठरणार लाभदायक

लवकरच भारतीय अर्थव्यवस्था चीनवर करणार मात, 2018 वर्ष ठरणार लाभदायक

जगभरातल्या अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षी चांगली प्रगती करत असून, भारतीय अर्थव्यवस्थाही 2018 या आर्थिक वर्षात चीनला पछाडत पुढे जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 10:06 PM2018-01-21T22:06:05+5:302018-01-21T22:30:36+5:30

जगभरातल्या अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षी चांगली प्रगती करत असून, भारतीय अर्थव्यवस्थाही 2018 या आर्थिक वर्षात चीनला पछाडत पुढे जाणार आहे.

Soon Indian economy will beat China, 2018 will be beneficial for the year | लवकरच भारतीय अर्थव्यवस्था चीनवर करणार मात, 2018 वर्ष ठरणार लाभदायक

लवकरच भारतीय अर्थव्यवस्था चीनवर करणार मात, 2018 वर्ष ठरणार लाभदायक

नवी दिल्ली- जगभरातल्या अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षी चांगली प्रगती करत असून, भारतीय अर्थव्यवस्थाही 2018 या आर्थिक वर्षात चीनला पछाडत पुढे जाणार आहे. सँक्टम वेल्थ मॅनेजमेंटनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जागतिक भांडवली बाजारात भारतीय अर्थव्यवस्थाही पाचव्या स्थानी राहणार आहे. त्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था जलद गतीनं  प्रगती करत चीनलाही मागे टाकणार असल्याचं या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

तसेच इक्विटी बाजाराच्या माध्यमातूनही भारताला चांगला परतावा मिळणार आहे. इतर विकसित देश जेव्हा 2 ते 3 टक्क्यांनी प्रगती साधतील त्याचवेळी भारतीय अर्थव्यवस्था ही 7.5 टक्क्यांच्या वेगानं प्रगतिपथावर असेल. इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था वेगानं प्रगती साधेल. विशेष म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था प्रगतिपथावर असताना चीनच्या अर्थ व्यवस्थेचा वेग धिमा होणार आहे. इक्विटी बाजाराच्या माध्यमातून भारताला जवळपास 6 ते 8 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतात महागाईत मोठी वाढ झाली तरी त्याचा बाजारावर कोणताही परिणाम होणार नाही. शेअर बाजारही यंदा नवे उच्चांक गाठणार असून, निफ्टीमध्ये 50 अंकांची वाढ नोंदवली गेली आहे, असंही अहवालात देण्यात आलं आहे. सद्यस्थितीत निफ्टी हा 10,580 पर्यंत पोहोचलेला आहे. येत्या काही दिवसांत हा निफ्टी 11500पर्यंत जाण्याचाही अंदाज या अहवालात मांडण्यात आला आहे. 

Web Title: Soon Indian economy will beat China, 2018 will be beneficial for the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.