Lokmat Money > बिझनेस न्यूज > शिओमीने लाँच केला Redmi 4A , जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

शिओमीने लाँच केला Redmi 4A , जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कंपनीने हा स्मार्टफोन गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात चीनमध्ये Xiaomi Redmi 4 आणि Xiaomi Redmi 4 Prime सोबत लाँच केला होता

By admin | Published: March 20, 2017 05:15 PM2017-03-20T17:15:29+5:302017-03-20T17:43:44+5:30

कंपनीने हा स्मार्टफोन गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात चीनमध्ये Xiaomi Redmi 4 आणि Xiaomi Redmi 4 Prime सोबत लाँच केला होता

Shyomi Launches Redmi 4A, Learn Price and FEATURES | शिओमीने लाँच केला Redmi 4A , जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

शिओमीने लाँच केला Redmi 4A , जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - शाओमीने भारतात आपला नवा स्मार्टफोन Redmi 4A लाँच केला आहे. हा स्मार्टफोन शाओमीच्या Redmi 4 सीरिजमधील सर्वात बेसिक वेरिअंट आहे. कंपनीने हा स्मार्टफोन गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात चीनमध्ये Xiaomi Redmi 4 आणि Xiaomi Redmi 4 Prime सोबत लाँच केला होता. या स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात. 
 
या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा HD डिस्प्ले असणार आहे ज्याचं रेजलूशन 720 x 1280 पिक्सल्स आहे. हा अँड्रॉईड फोन 6.0 मार्शमैलोवर आधारित कंपनीच्या यूजर इंटरफेस MIUI8 वर चालतो. 
 
यामध्ये 1.4GHz च्या क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन, 425 प्रोसेसरसोबत दोन जीबी रॅम उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये इंटरनल मेमरी 16 जीबी असून 128 जीबी पर्यंतच मायक्रोएसडी कार्ड वापरलं जाऊ शकतं.
 
Redmi 4A मध्ये बॅक कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. यामध्ये PDAF, 5 लेन्स सिस्टम, f/2.2 अपर्चर आणि LED फ्लैश आहे. फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. 
 
पॉलिकार्बोनेट बॉडी असणा-या Redmi 4A मध्ये ड्यूअल सीम कार्ड स्लॉट आहे. कनेक्टिव्हीटीबद्दल बोलायचं गेल्यास यामध्ये 4G VoLTE, वाय-फाय, जीपीएस, ब्लूट्यूथ आणि मायक्रो-यूएसबी सपोर्ट असणार आहे. यामध्ये 3120 mAh बॅटरी असून लवकरात लवकर चार्जिंग करण्यास मदत मिळेल. 
 
शाओमी Redmi 4A ची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून अॅमेझॉन आणि  मी.कॉम वर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. डार्क ग्रे आणि गोल्ड रंगात हा फोन उपलब्ध असेल. 
 

Web Title: Shyomi Launches Redmi 4A, Learn Price and FEATURES

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.