Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकिंग, एफएमसीजी आणि तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केल्यामुळे सेन्सेक्स १०० अंकांनी वाढला, निफ्टीही तेजीत

बँकिंग, एफएमसीजी आणि तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केल्यामुळे सेन्सेक्स १०० अंकांनी वाढला, निफ्टीही तेजीत

मुंबई : बँकिंग, एफएमसीजी आणि तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केल्यामुळे, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १००.६२ अंकांनी वाढून ३२,६०७.३४ अंकांवर बंद झाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 04:09 AM2017-10-25T04:09:13+5:302017-10-25T04:09:21+5:30

मुंबई : बँकिंग, एफएमसीजी आणि तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केल्यामुळे, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १००.६२ अंकांनी वाढून ३२,६०७.३४ अंकांवर बंद झाला.

Sensex rises 100 points as banking, FMCG and oil PSU stocks gain | बँकिंग, एफएमसीजी आणि तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केल्यामुळे सेन्सेक्स १०० अंकांनी वाढला, निफ्टीही तेजीत

बँकिंग, एफएमसीजी आणि तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केल्यामुळे सेन्सेक्स १०० अंकांनी वाढला, निफ्टीही तेजीत

मुंबई : बँकिंग, एफएमसीजी आणि तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केल्यामुळे, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १००.६२ अंकांनी वाढून ३२,६०७.३४ अंकांवर बंद झाला. आदल्या सत्रात सेन्सेक्स ११६.७६ अंकांनी वाढला होता. राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी २२.८५ अंकांनी वाढून, १०,२०७.७० अंकावर बंद झाला.
एशियन पेंटस्चे समभाग सर्वाधिक वाढले. त्या खालोखाल एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एनटीपीसी, ओएनजीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील, पॉवर ग्रीड, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, एल अँड टी, अ‍ॅक्सिस बँक, सिप्ला, आयटीसी, एचडीएफसी लिमिटेड, डॉ. रेड्डीज यांचे समभाग वाढले. घसरण झालेल्या कंपन्यांत इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, लुपीन, सन फार्मा, एम अँड एम, हीरो मोटोकॉर्प, टीसीएस, अदाणी पोर्टस् आणि विप्रो यांचा समावेश आहे.
>सोने, चांदी तेजीत
नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात सोने ६0 रुपयांनी वाढून ३0,५१0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदी १00 रुपयांनी वाढून ४१ हजार रुपये किलो झाली. गेल्या तीन सत्रांत सोने ५५0 रुपयांनी उतरले होते. स्थानिक ज्वेलर्सनी केलेल्या जोरदार खरेदीचा सोन्याला लाभ झाला. औद्योगिक क्षेत्रातील वाढलेल्या मागणीमुळे चांदी तेजाळली. न्यूयॉर्क येथील बाजारात सोने 0.१६ टक्क्याने वाढून १,२८२ डॉलर प्रतिऔंस झाले. चांदी 0.३२ टक्क्याने वाढून १७.0५ डॉलर प्रतिऔंस झाली.

Web Title: Sensex rises 100 points as banking, FMCG and oil PSU stocks gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.