lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुरुवातीच्या धक्क्यातून शेअर बाजार सावरला, सेंसेक्स 231 अंकांनी वधारला

सुरुवातीच्या धक्क्यातून शेअर बाजार सावरला, सेंसेक्स 231 अंकांनी वधारला

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी भाजपाविरोधात आलेले कल आणि आरबीआयचे प्रमुख उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे सुरुवातीच्या सत्रात कोसळलेला शेअर बाजार दुपारनंतर सावरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 03:22 PM2018-12-11T15:22:06+5:302018-12-11T15:29:56+5:30

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी भाजपाविरोधात आलेले कल आणि आरबीआयचे प्रमुख उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे सुरुवातीच्या सत्रात कोसळलेला शेअर बाजार दुपारनंतर सावरला.

Sensex recovers 231 points in early trade | सुरुवातीच्या धक्क्यातून शेअर बाजार सावरला, सेंसेक्स 231 अंकांनी वधारला

सुरुवातीच्या धक्क्यातून शेअर बाजार सावरला, सेंसेक्स 231 अंकांनी वधारला

मुंबई - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी भाजपाविरोधात आलेले कल आणि आरबीआयचे प्रमुख उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे सुरुवातीच्या सत्रात कोसळलेला शेअर बाजार दुपारनंतर सावरला. सकाळी सुरुवातीच्या काळात 500 हून अधिक अंकांनी कोसळलेल्या शेअर बाजाराने दुपारी अडीच वाजेपर्यंत 119 अंकांनी उसळी घेतली.  दरम्यान, निफ्टीमध्येही  सुधारणा झाली असून, 42.5 अंकांनी निफ्टची वधारला आहे. 

 मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपा पिछाडीवर पडल्याचे मोठे पडसाद शेअर बाजारात उमटले होते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी घसरण होऊन सेंसेक्स 500 हून अधिक अंकांनी घसरला. तर दिवसाच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला होता. 

दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीला कालही शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. सोमवारी व्यवहारांना सुरुवात झाल्यावर मुंबई शेअरबाजाराचा संवेदनशील सूचकांक असलेल्या सेंसेक्समध्ये मोठी पडझड झाली. भागधारकांनी विक्रीचा धडाका लावल्याने सेंसेक्स 609.58 अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्येही  187 आंकांनी घसरण झाली होती. 

Web Title: Sensex recovers 231 points in early trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.