Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाच राज्यातील कलांनंतर शेअर बाजारात खळबळ, सेंसेक्स 500 अंकांनी कोसळला 

पाच राज्यातील कलांनंतर शेअर बाजारात खळबळ, सेंसेक्स 500 अंकांनी कोसळला 

मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपा पिछाडीवर पडल्याचे मोठे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 09:40 AM2018-12-11T09:40:10+5:302018-12-11T10:05:23+5:30

मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपा पिछाडीवर पडल्याचे मोठे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत.

Sensex down 500 points in five markets | पाच राज्यातील कलांनंतर शेअर बाजारात खळबळ, सेंसेक्स 500 अंकांनी कोसळला 

पाच राज्यातील कलांनंतर शेअर बाजारात खळबळ, सेंसेक्स 500 अंकांनी कोसळला 

मुंबई -  मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपा पिछाडीवर पडल्याचे मोठे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून, सेंसेक्स 500 हून अधिक अंकांनी घसरला आहे. तर दिवसाच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला आहे. 

दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीला कालही शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. सोमवारी व्यवहारांना सुरुवात झाल्यावर मुंबई शेअरबाजाराचा संवेदनशील सूचकांक असलेल्या सेंसेक्समध्ये मोठी पडझड झाली. भागधारकांनी विक्रीचा धडाका लावल्याने सेंसेक्स 609.58 अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्येही  187 आंकांनी घसरण झाली होती. 


तसेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिलेल्या राजीनमाम्याचा परिणामही बाजारावर झाल्याची शक्यत आहे.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.  उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उर्जित पटेल मोदी सरकारच्या दडपणाखाली काम करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेतील सूत्रानुसार, पटेल आज ऑफिसला आले तेव्हापासूनच शांत होते, दुपार नंतर राजीनामा देत ते निघून गेले.
 

Web Title: Sensex down 500 points in five markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.