Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजार पुन्हा गडगडला, सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला; मिनिटात 2.24 लाख कोटी झाले गायब

शेअर बाजार पुन्हा गडगडला, सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला; मिनिटात 2.24 लाख कोटी झाले गायब

सेन्सेक्स जवळपास 550 अंकांनी घसरला असून, निफ्टीदेखील 150 अंकानी खाली आला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5 टक्क्यांच्या घसरणीसोबत सुरु आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 10:39 AM2018-02-09T10:39:11+5:302018-02-09T10:53:29+5:30

सेन्सेक्स जवळपास 550 अंकांनी घसरला असून, निफ्टीदेखील 150 अंकानी खाली आला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5 टक्क्यांच्या घसरणीसोबत सुरु आहेत.

Sensex down 500 points in early trade; 2.24 lakh crore loss for traders | शेअर बाजार पुन्हा गडगडला, सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला; मिनिटात 2.24 लाख कोटी झाले गायब

शेअर बाजार पुन्हा गडगडला, सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला; मिनिटात 2.24 लाख कोटी झाले गायब

मुंबई - अर्थसंकल्पानंतरचा आठवडा शेअर बाजारासाठी तितकासा चांगला राहिलेला नाही. गेल्या आठवडाभरापासून शेअर बाजार सतत कोसळत असल्याचं दिसत आहे. गुरुवारीही शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली होती. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजार मोठ्या घसरणीसोबत उघडला आहे. सेन्सेक्स जवळपास 550 अंकांनी घसरला असून, निफ्टीदेखील 150 अंकानी खाली आला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5 टक्क्यांच्या घसरणीसोबत सुरु आहेत. मार्केट सुरु होताच काही मिनिटात गुंतवणुकदारांना 2.24 लाख कोटींचा फटका बसला आहे. बीएसईचे 10 ते 8 स्टॉक्स रेड मार्कवर ट्रेड करत आहेत. 

शेअर बाजार शुक्रवारी खुला होताच सेन्सेक्समध्ये 526.26 अंकांनी घसरण नोंदवत 33886.90 अंकांपर्यंत खाली आला. तर निफ्टीही 177.50 अंकांनी घसरून 10.399 अंकांवर पोहोचला. 
 

Web Title: Sensex down 500 points in early trade; 2.24 lakh crore loss for traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.