Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारामध्ये घसरणीचा ‘बॉम्ब’!, सेन्सेक्स ४४८ अंकांनी कोसळला, निफ्टी १० हजारांखाली

शेअर बाजारामध्ये घसरणीचा ‘बॉम्ब’!, सेन्सेक्स ४४८ अंकांनी कोसळला, निफ्टी १० हजारांखाली

उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीचे संकेत दिल्यानंतर अत्यंत संवेदनशील असलेल्या मुंबईच्या शेअर बाजारातही घसरणीचा बॉम्ब पडला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४४७ अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराने १० हजारांखाली गटांगळी खाल्ली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:57 AM2017-09-23T00:57:10+5:302017-09-23T00:57:12+5:30

उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीचे संकेत दिल्यानंतर अत्यंत संवेदनशील असलेल्या मुंबईच्या शेअर बाजारातही घसरणीचा बॉम्ब पडला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४४७ अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराने १० हजारांखाली गटांगळी खाल्ली.

Sensex down 448 points, Nifty falls below 10,000 | शेअर बाजारामध्ये घसरणीचा ‘बॉम्ब’!, सेन्सेक्स ४४८ अंकांनी कोसळला, निफ्टी १० हजारांखाली

शेअर बाजारामध्ये घसरणीचा ‘बॉम्ब’!, सेन्सेक्स ४४८ अंकांनी कोसळला, निफ्टी १० हजारांखाली

मुंबई : उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीचे संकेत दिल्यानंतर अत्यंत संवेदनशील असलेल्या मुंबईच्या शेअर बाजारातही घसरणीचा बॉम्ब पडला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४४७ अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराने १० हजारांखाली गटांगळी खाल्ली. देशभरातील राजकीय घडामोडींमुळे मेटल, बँकिंग, रिअल्टी आणि एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर्सला जोरदार फटका बसला.
सणासुदीमुळे वस्तू, वाहन आणि सोने खरेदी-विक्रीचा ओघ वाढल्याने कंपन्यांचा फायदा होऊन त्यांचे शेअर्सही वधारतील असे चित्र होते. त्यामुळे काही दिवसांपासून सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीच्या रथावर स्वार होत नवनवे विक्रम करत होता. सेन्सेक्सने ३२ हजारी तर निफ्टीने १० हजारी उच्चांक पार केला होता. मात्र, शुक्रवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्सला घसरणीचे ग्रहण लागले. सेन्सेक्स ४४८ अंकांनी कोसळून ३१,९२२ अंकांवर बंद झाला तर निफ्टी १५७ अंकांनी घसरून ९,९६४ अंकांवर बंद झाला.
>घसरणीची चार कारणे
अमेरिकेची प्रमुख बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचे संकेत दिल्यानंतर रुपयात मोठी घसरण पाहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. आॅगस्ट महिन्यापासून परकीय गुंतवणूकदारांनी विक्रीचा ओघ सुरू ठेवला आहे.
१ आॅगस्टपासून ते
२१ सप्टेंबरपर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून १७ हजार २१३ कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे. देशाच्या विकासदरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चालू वित्त वर्षाचा विकासदर ७.३ राहील असा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, जीएसटी-नोटाबंदीचा परिणाम होत असल्याने ओईसीडी या संस्थेने हा अंदाज ६.७%वर आणला आहे. त्याचा फटका शेअर बाजारात दिसला. आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या भीतीचे वातावरण आहे. उत्तर कोरिया आणि अमेरिकेत सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्याचे प्रत्यंतर कधीही युद्धात होईल अशी भीती आहे. अमेरिकेने उत्तर कोरिया उद्ध्वस्त करू अशी धमकी दिल्यानंतर उत्तर कोरियानेही हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीची धमकी दिली आहे.
>गटांगळी
शेअर बाजारात बड्या समजल्या जाणाºया कंपन्यांच्या शेअर्सने गटांगळी खाल्ली. टाटा स्टील कंपनीचा शेअर ४.७ टक्के आपटला. त्याखालोखाल एलअ‍ॅण्डटीचा शेअर ३.४९ टक्के खाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प, एसबीआय, अदानी पोर्ट्सचे शेअर दणक्यात आपटले.

Web Title: Sensex down 448 points, Nifty falls below 10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.