Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स ३२३ अंकांनी उसळला

सेन्सेक्स ३२३ अंकांनी उसळला

जागतिक पातळीवरील तेजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२२.६५ अंकांनी वाढून ३४,१४२.१५ अंकांवर बंद झाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 03:34 AM2018-02-24T03:34:26+5:302018-02-24T03:34:26+5:30

जागतिक पातळीवरील तेजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२२.६५ अंकांनी वाढून ३४,१४२.१५ अंकांवर बंद झाला.

Sensex up 323 points | सेन्सेक्स ३२३ अंकांनी उसळला

सेन्सेक्स ३२३ अंकांनी उसळला

मुंबई : जागतिक पातळीवरील तेजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२२.६५ अंकांनी वाढून ३४,१४२.१५ अंकांवर बंद झाला. १५ फेब्रुवारी रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. आदल्या सत्रात सेन्सेक्स २५.३६ अंकांनी घसरला होता. राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी १०८.३५ अंकांनी वाढून १०,४९१.०५ अंकांवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स १३१.३९ अंकांनी, तर निफ्टी ३८.७५ अंकांनी वाढला.
तेजीचा लाभ झालेल्या कंपन्यांत टाटा स्टील, सन फार्मा, येस बँक, भारती एअरटेल, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज्, एनटीपीसी, एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक, टीसीएस, पॉवर ग्रीड, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, आरआयएल, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एल अँड टी, बजाज आॅटो, आयटीसी, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, अदाणी पोर्टस् आणि एचडीएफसी लि. यांचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँक आणि गीतांजली जेम्स यांचे समभाग घसरले.

Web Title: Sensex up 323 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.