Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्जवसुलीसाठी एसबीआय विकणार कंपन्यांची मालमत्ता

कर्जवसुलीसाठी एसबीआय विकणार कंपन्यांची मालमत्ता

कर्ज थकवलेल्या दोन कर्जदारांची एकूण २,४९० कोटी रूपयांची मालमत्ता स्टेट बँक आॅफ इंडिया विकणार असून त्यासाठी निविदा २० आॅगस्ट रोजी खुल्या होतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 04:38 AM2018-08-13T04:38:10+5:302018-08-13T04:38:39+5:30

कर्ज थकवलेल्या दोन कर्जदारांची एकूण २,४९० कोटी रूपयांची मालमत्ता स्टेट बँक आॅफ इंडिया विकणार असून त्यासाठी निविदा २० आॅगस्ट रोजी खुल्या होतील.

SBI will sell Property of companies for loan recovery | कर्जवसुलीसाठी एसबीआय विकणार कंपन्यांची मालमत्ता

कर्जवसुलीसाठी एसबीआय विकणार कंपन्यांची मालमत्ता

मुंबई : कर्ज थकवलेल्या दोन कर्जदारांची एकूण २,४९० कोटी रूपयांची मालमत्ता स्टेट बँक आॅफ इंडिया विकणार असून त्यासाठी निविदा २० आॅगस्ट रोजी खुल्या होतील. कर्ज थकवणाऱ्यांच्या मालमत्तांच्या विक्रीसाठीच्या बँकेच्या नव्या धोरणानुसार ही कार्यवाही केली जात असल्याचे बँकेने निविदांच्या दस्तावेजात म्हटले आहे.
बँकेचे बाँबे रेयॉन फॅशन्स लिमिटेडकडे २,२६०.७९ कोटी तर शिवम धातू उद्योग प्रायव्हेट लिमिटेडकडे २२९.३२ कोटी रूपये थकले आहेत.
बाँबे रेयॉनकडील थकलेल्या कर्जात इक्विटी इन्व्हेस्टमेंटचा समावेश नाही. ई-निविदा २० आॅगस्ट रोजी खुल्या होतील. स्टेट बँकेने यावर्षी जूनअखेर दिलेल्या कर्जाच्या १०.६९ टक्के हे थकीत कर्ज असून ते गेल्या वर्षी ९.९७ टक्के होते. रूपयांमध्ये विचार केला तर
थकीत कर्ज १,८८,०६८ कोटी रूपयांवरून २,१२,८४० कोटी रूपये झाले आहे.
 

Web Title: SBI will sell Property of companies for loan recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.