Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBIची जबरदस्त सुविधा, आता ATMमधून काढता येणार FDतले पैसे

SBIची जबरदस्त सुविधा, आता ATMमधून काढता येणार FDतले पैसे

बँकांत मुदत ठेवी(FD)मध्ये पैसे गुंतवणं हे सर्वाधिक सुरक्षित आणि सोयीस्कर मानलं गेलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 08:55 AM2019-03-19T08:55:50+5:302019-03-19T09:04:28+5:30

बँकांत मुदत ठेवी(FD)मध्ये पैसे गुंतवणं हे सर्वाधिक सुरक्षित आणि सोयीस्कर मानलं गेलं आहे.

sbi multi optional deposit account scheme you can withdraw fd money from atm | SBIची जबरदस्त सुविधा, आता ATMमधून काढता येणार FDतले पैसे

SBIची जबरदस्त सुविधा, आता ATMमधून काढता येणार FDतले पैसे

नवी दिल्ली- बँकांत मुदत ठेवी(FD)मध्ये पैसे गुंतवणं हे सर्वाधिक सुरक्षित आणि सोयीस्कर मानलं गेलं आहे. त्यामुळेच बरेच लोक एफडीमध्ये पैशांची गुंतवणूक करतात. परंतु या धकाधकीच्या जीवनात बँकांमध्ये जाऊन एफडी करणं आणि त्या पुन्हा मोडून पैसे काढणं फारच वेळखाऊ काम आहे. या समस्येचं समाधान देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली एबीआय घेऊन आली आहे. SBI मल्‍टी ऑप्‍शन डिपॉजिट (MOD)च्या नावे एक FDची सुविधा देते. यात आपल्याला गरज असेल तेव्हा 1000हून अधिकची रक्कम काढता येणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम एटीएमच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. पण SBI मल्‍टी ऑप्‍शन डिपॉजिट (MOD)मध्ये किमान मासिक ठरावीक पैसे असणे बंधनकारक आहे. 

  • काय आहे मल्‍टी ऑप्‍शन डिपॉजिट (MOD)- हे एक प्रकारचे टर्म डिपॉझिट असते. यामध्ये ग्राहकाचं बचत खातं हे चालू खात्याशी जोडलं जातं. जर आपल्याला चालू खात्यातून पैसे काढायचे आहेत. पण चालू खात्यात पैसे नसल्यास एमओडीमधून काढता येणार आहेत. मुदत ठेवी(FD)वर जेवढं व्याज मिळतं, तेवढंच व्याज एमओडीवर दिलं जातं. एमओडीमधून पैसे काढल्यानंतर ऊर्वरित रकमेवर व्याज मिळत राहतं.  
  • कसे उघडाल मल्‍टी ऑप्‍शन डिपॉजिट (MOD)- यासाठी आपल्याला खात्यात किमान 10 हजार रुपये ठेवणे बंधनकारक आहे. त्यानंतर या खात्यात 1 हजार आणि त्याहून अधिक पैसे जमा करता येतात. यात जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याची कोणतीही मर्यादा नाही. यात आपल्याला खातं 1 वर्षापासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी उघडता येतं. यात मुदत पूर्वीही MODडी मोडता येते. तसेच ग्राहकाला कर्ज आणि नॉमिनी लावण्याची सुविधाही पुरवली जाते. 


स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहकांसाठी नवे मोबाइल अ‍ॅप

स्टेट बँक इंडियाने (एसबीआय) ‘यू ओन्ली नीड वन’ (योनो) हे नवे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. बँकेच्या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरणारे आहे. या मोबाईल अ‍ॅपद्वारे खाते उघडणे, पैसे काढणे, भरणे, पैसे दुसऱ्याला पाठविणे, कर्ज मिळविणे, आदी प्रक्रिया करता येणार आहे. विविध सेवा-सुविधा पुरविणाऱ्या, वस्तूंची विक्री करणाऱ्या ८५ कंपन्यांसमवेत ‘एसबीआय’ने करार केला आहे. या कंपन्यांची सुविधा अ‍ॅपमध्ये असणार आहे. शेतकऱ्यांसाठी अ‍ॅप उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Web Title: sbi multi optional deposit account scheme you can withdraw fd money from atm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SBIएसबीआय