Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBIसह देशातील 4 सर्वात मोठ्या बँकांचं कर्ज महागलं, आता एवढा वाढणार हफ्ता!

SBIसह देशातील 4 सर्वात मोठ्या बँकांचं कर्ज महागलं, आता एवढा वाढणार हफ्ता!

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयनं मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेंडिंग रेट(एमसीएलआर)मध्ये 0.05 टक्क्यांची वाढ केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 04:34 PM2018-10-02T16:34:29+5:302018-10-02T16:35:18+5:30

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयनं मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेंडिंग रेट(एमसीएलआर)मध्ये 0.05 टक्क्यांची वाढ केली आहे.

With the SBI, the loan of 4 largest banks in the country was expensive, now it will increase EMI | SBIसह देशातील 4 सर्वात मोठ्या बँकांचं कर्ज महागलं, आता एवढा वाढणार हफ्ता!

SBIसह देशातील 4 सर्वात मोठ्या बँकांचं कर्ज महागलं, आता एवढा वाढणार हफ्ता!

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयनं मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेंडिंग रेट(एमसीएलआर)मध्ये 0.05 टक्क्यांची वाढ केली आहे. त्याशिवाय पंजाब नॅशनल बँक, HDFC लिमिटेड, ICICI बँक या बँकांनीही व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे आता या चार बँकांमधून होम, ऑटो आणि पर्सनल लोनचं कर्ज घेणा-या ग्राहकांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)सुद्धा व्याजदर निश्चित करण्यासाठी 4 ते 5 ऑक्टोबरला बैठक घेणार आहेत. सिंगापूर बेस्ड डीबीएस बँकेच्या अर्थतज्ज्ञ राधिका राव यांनी एक रिसर्च नोट लिहिली आहे. त्यामुळे हे व्याजदर रिझर्व्ह बँक आणखी वाढवण्याची शक्यता आहे. 

  • कोणत्या बँकेनं किती वाढवले व्याजदर

- एसबीआयनं मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेंडिंग रेट(एमसीएलआर)मध्ये 0.05 टक्क्यांची वाढ केली आहे.
- पीएनबीनं अल्पकालीन कर्जासाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट 0.2 टक्क्यांनी वाढवला आहे. 
- एचडीएफसी लिमिटेडनं रिटेल प्राइस लेंडिंग रेट (आरपीएलआर)मध्ये 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे. वेगवेगळ्या टप्प्यांतील कर्जासाठी नवे दर 8.80 ते 9.05 टक्के असतील.  
- आयसीआयसीआय बँकेनं एमसीएलआरमध्ये 0.1 टक्क्यांची वाढ केली आहे. 

  • आता काय होणार- मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर)मध्ये वाढ केल्यानं आता कर्ज महागणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा आता पर्सनल, ऑटो आणि होम लोनचा हफ्ता वाढणार असून, ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.  
  • काय असते मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर)- एप्रिल 2016पासून सर्व बँकांचा सेलिंग मार्क दर मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट(एमसीएलआर)च्या आधारावर ठरवला जातो. तत्पूर्वी बँकांच्या कर्जाचे दर हे बेस रेटवर ठरत होते. त्यामुळे तुम्ही 1 एप्रिल 2016च्या पूर्वी कर्ज घेतलं असल्यास कर्ज बेस रेटच्या आधारावर असेल. 
  • असं तयार होतो एमसीएलआर- एमसीएलआर हा ऑपरेटिंग खर्च, सीआरआर मेटनन्स खर्च, सेव्हिंग्ज/करंट/ टर्म डिपॉझिट अकाऊंटवर देण्यात येणा-या व्याज, रेपो रेट, नेटवर्थ रिटर्न, टेन्योर प्रीमियमवर ठरवला जातो.  
  • कसा तयार होतो बेस रेट- ऑपरेटिंग खर्च, सीआरआर मेंटनन्स खर्च, सेविंग्स/करेंट/टर्म डिपॉजिट अकाऊंटवरील व्याजावर बेस रेट ठरवला जातो. 
  • बेस रेट-एमसीएलआर हे वेगवेगळे असतात. एमसीएलआर हा बँकांनी दिलेल्या कर्जाची किंमत आणि नेटवर्थमधून मिळणा-या रिटर्न्सला ध्यानात ठेवून तयार केला जातो. यात रेपो रेटमध्ये झालेले बदल आणि टेन्योर प्रीमियमलाही लक्षात ठेवलं जातं. तर बेस रेटमध्ये रेपो रेटमधील बदल आणि टेन्योर प्रीमियम लक्षात ठेवलं जात नाही. त्यामुळे एमसीएलआर हे महिन्यामहिन्याला बदलत असतो आणि बँकेचा एमसीएलआर वेगवेगळा असतो. 

Web Title: With the SBI, the loan of 4 largest banks in the country was expensive, now it will increase EMI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.