Good News - SBI ने व्याजदरात केली कपात, ८0 लाख ग्राहकांना होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क on Tue, January 02, 2018 12:40am

स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) आधार दर आणि प्रधान कर्ज दर (बीपीएलआर) ३0 आधार अंकांनी कमी केला आहे. या निर्णयाचा बँकेच्या ८0 लाख ग्राहकांना फायदा होणार आहे, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) आधार दर आणि प्रधान कर्ज दर (बीपीएलआर) ३0 आधार अंकांनी कमी केला आहे. या निर्णयाचा बँकेच्या ८0 लाख ग्राहकांना फायदा होणार आहे, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले. एसबीआयने आधार दर ८.९५ टक्क्यांवरून ८.६५ टक्के केला आहे. बीपीएलआरही १३.७0 टक्क्यांवरून १३.४0 टक्के केला. बँकेने मार्जिनल कॉस्ट आॅफ फंड बेस्ड लेंडिग रेट (एमसीएलआर) अपरिवर्तित ठेवला. एमसीएलआरमधील बदलाचा सर्व प्रकारच्या कर्जदारांवर परिणाम होतो. सध्या बँकेचा एकवर्षीय एमसीएलआर ७.९५ टक्के आहे, तो कायम राहणार आहे. बदललेले व्याजदर तत्काळ प्रभावाने सोमवारपासूनच लागू होणार आहेत. बँका आपल्या एमसीएलआरचा आढावा दर महिन्याला घेतात. आधार दराचा आढावा मात्र तीन महिन्यांतून एकदा घेतला जातो. गुप्ता यांनी सांगितले की, एमसीएलआर आणि आधार दरातील दरी वाढल्यामुळे या आधी बँकेने एमसीएलआरमध्ये कपात केली होती. गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्काची माफी बँकेने यंदाच्या मार्चअखेरपर्यंत वाढविलेली आहे. नवीन गृहकर्ज घेणारे, तसेच सध्याचे गृहकर्ज एसबीआयडे हस्तांतरित करू इच्छिणारे, यांना याचा लाभ मिळेल. ग्राहकांना होणार मोठा लाभ एसबीआयचे रिटेल व डिजिटल बँकिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व्याजदरांचा आढावा घेतला होता. त्यानुसार, आम्ही आमचा आधार दर ३0 आधार अंकांनी कमी करून ८.६५ टक्के केला आहे. जुना व्याजदर अदा करणारे, तसेच एमसीएलआर व्यवस्थेत स्थलांतरित न झालेले ८0 लाख ग्राहक या बदलाचे लाभधारक ठरतील.

संबंधित

वसंतदादा बँक घोटाळ्यास ‘सहकार’चा खो, स्थगितीचा सपाटा, अंतिम टप्प्यात येऊ सुनावणी रेंगाळली  
डोंबिवलीत बँक ग्राहकांना गंडा! कॅनेरा, युनियन बँकेचे आठ खातेदार अडचणीत
कोल्हापूर : दहा हजार शेतकऱ्यांची सोमवारी ‘नाबार्ड’वर धडक, अपात्र ११२ कोटी परत देण्यासाठी पुणे कार्यालयासमोर ठिय्या
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भारतातील उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँकेचा ‘बँको’ पुरस्कार
अरे बापरे! डोंबिवलीत बँक ग्राहकांचे पैसे कोणीतरी दिल्लीतून काढले

व्यापार कडून आणखी

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न : धर्मेंद्र प्रधान
शेअर बाजाराची ऐतिहासिक कामगिरी, सेन्सेक्स, निफ्टीनं केला रेकॉर्ड ब्रेक
सेन्सेक्स, निफ्टीने गाठली आणखी नवीन उंची
‘ई-वे बिल’च्या राजपथावर करदात्यांची परेड
महासत्तेत आर्थिक कोंडी : सरकारचे कामकाज ठप्प, सात लाख कर्मचारी सध्या बसले घरी

आणखी वाचा