Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBIच्या 'या' ऑनलाइन सुविधा बंद, जाणून घ्या तुमच्यावर काय पडणार प्रभाव

SBIच्या 'या' ऑनलाइन सुविधा बंद, जाणून घ्या तुमच्यावर काय पडणार प्रभाव

भारतीय स्टेट बँके(एसबीआय)नं स्वतःच्या अॅपवरील अनेक सुविधा बंद केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 02:24 PM2018-11-19T14:24:24+5:302018-11-19T14:24:36+5:30

भारतीय स्टेट बँके(एसबीआय)नं स्वतःच्या अॅपवरील अनेक सुविधा बंद केल्या आहेत.

sbi bank sbionline shuts yono bank account opening service rbi | SBIच्या 'या' ऑनलाइन सुविधा बंद, जाणून घ्या तुमच्यावर काय पडणार प्रभाव

SBIच्या 'या' ऑनलाइन सुविधा बंद, जाणून घ्या तुमच्यावर काय पडणार प्रभाव

नवी दिल्ली- भारतीय स्टेट बँके(एसबीआय)नं स्वतःच्या अॅपवरील अनेक सुविधा बंद केल्या आहेत. एसबीआयच्या योनो ('यू ओनली नीड वन)च्या अनेक सुविधा प्रभावित झाल्या आहेत. बँकेनं गेल्या काही दिवसांपूर्वीच योनोच्या माध्यमातून कागदपत्रांशिवाय खातं उघडण्याच्या सुविधेला तात्काळ बंद केलं आहे. त्यामुळे आपल्याला आता एसबीआय बँकेत खातं उघडायचं असल्यास बँकेच्या शाखेत जावे लागणार आहे.

खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बँकेनं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं आता यासंदर्भात आरबीआयकडे विचारणा केली आहे. बँकेनं नोव्हेंबर 2017मध्ये योनोची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती, त्यानंतर योनोच्या माध्यमातून 25 लाख लोक बँकेशी जोडले गेले. बँकेचं योनोच्या माध्यमातून ग्राहकांची संख्या 25 कोटींपर्यंत नेण्याचं लक्ष्य होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बँकेनं ही सुविधाच बंद केली आहे. 

  • बंद झाल्या या सुविधा- एसबीआयनं यू ओनली नीड वन(योनो)च्या माध्यमातून कागदपत्रांशिवाय ऑनलाइन पद्धतीनं खातं उघडण्याची सुविधा बंद केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता खातं उघडण्यासाठी बँकेत जावं लागणार आहे. 
  • बँकेनं RBIला लिहिलं पत्र- एसबीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, ई-केवायसीची परवानगी नाही. त्यामुळे आम्हाला आरबीआयकडून काही स्पष्टीकरण हवं आहे. आम्ही यासंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. जेव्हा आरबीआयकडून स्पष्टीकरण येईल, तेव्हा आम्ही पुन्हा ई-केवायसी सुरू करू. सर्वोच्च न्यायालयानं 26 सप्टेंबरला दिलेल्या आदेशात बँक खातं उघडण्यासाठी आधार क्रमांक गरजेचा नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर एसबीआयनं 'यू ओनली नीड वन (योनो)' च्या माध्यमातून कागदपत्रांशिवाय खातं उघडण्याची सुविधा तात्काळ बंद केली. त्यामुळे ग्राहकांना आता खातं उघडण्यासाठी बँकेत जावं लागणार आहे. 

Web Title: sbi bank sbionline shuts yono bank account opening service rbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SBIएसबीआय