Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोस्टाची ही योजना आहे खास, करोडपती बनवेल हमखास

पोस्टाची ही योजना आहे खास, करोडपती बनवेल हमखास

पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या सामान्य व्यक्तीलाही करोडपती बनवू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 12:25 PM2019-04-28T12:25:36+5:302019-04-28T12:26:13+5:30

पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या सामान्य व्यक्तीलाही करोडपती बनवू शकता

saving and current account post office how open accounts indian post | पोस्टाची ही योजना आहे खास, करोडपती बनवेल हमखास

पोस्टाची ही योजना आहे खास, करोडपती बनवेल हमखास

नवी दिल्ली- अनेकांना वाटतं करोडपती होणं हे आपल्या आवाक्यातील काम नाही. परंतु खरं तर असं काहीही नाही. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या सामान्य व्यक्तीलाही करोडपती बनवू शकता, फक्त त्यासाठी त्या योजनांची इत्थंभूत माहिती असणं गरजेचं आहे. पोस्ट ऑफिसमध्ये आपण गुंतवलेल्या पैशाची योग्य हमी मिळते. ज्याचा फायदा ग्राहकांना होतो. पोस्टात पीपीएफ खातं उघडल्यास तेही आपल्याला बराच नफा मिळवून देते. पीपीएफ खात्याची मर्यादा 15 वर्षांची असते. पोस्टापासून काही ठरावीक बँकांच्या शाखांमध्येही हे खातं उघडता येते. पीपीएफ खात्यामध्ये वर्षातून एका 12 वेळा पैसे जमा केले जाऊ शकतात.

वर्षाला कमीत कमी 500, तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणूक करावी लागते. पीपीएफ अकाऊंटचे व्याजदर वेळोवेळी बदलत असतात. पीपीएफवर 8 टक्के व्याज मिळते. सरकारची सर्व छोट्या योजनांसह पीपीएफच्या व्याजदरात 50 बेसिस पॉइंट म्हणजे 0.50 टक्के वाढ करण्याची मनीषा आहे. त्यामुळे सरकार जानेवारी-मार्च या टप्प्यात व्याजदरात वाढ करू शकते. पीपीएफवर मिळणा-या कंपाऊंड इंटरेस्टची दरवर्षी गणना होते. जर तुम्ही 1.5 लाख रुपये वर्षाला जमा करत असाल, तर तुम्हाला 8 टक्के व्याजदरानं 15 वर्षांनंतर 43.93 लाख रुपये मिळणार आहेत. तसेच 24 वर्षांनंतर तुम्हाला पीपीएफमध्ये गुंतवलेल्या पैशावरच्या व्याजासह 1.08 कोटी रुपये मिळतील. म्हणजे तुम्ही 24 वर्षांत करोडपती होऊ शकता. तसेच 30 वर्षांनी तुम्हाला गुंतवलेल्या पैशावर व्याजदरासह 1.83 कोटींचा परतावा मिळणार आहे.

15 वर्षीय सार्वजनिक भविष्य निधी खातं(पीपीएफ)- पीपीएफचं खातं आपल्याला 100 रुपयांमध्ये उघडता येते. यातील जमा रकमेवर 8 टक्के व्याज दिलं जातं. खातेधारकांना आपल्या खात्यात 500 रुपये आणि जास्तीत जास्त करून 1.50 लाख रुपये जमा करावे लागतात. तसेच खात्याची मर्यादा 15 वर्षांसाठी असते. यात आपण संयुक्त खातंही उघडू शकतो. आपल्याला या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही प्राप्त होते. यात एका वित्त वर्षात तुम्हाला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो.
अशी करा गुंतवणूक- दररोज 200 रुपयांची पोस्टाच्या योजनेत बचत केल्यास मुदत संपेपर्यंत आपल्याला हातात 21 लाख रुपये येतात. समजा आपलं वय 25 वर्षं असून, 50 हजार पगार आहे. अशातच आपल्या दैनंदिन खर्चातील 200 रुपये वाचवून गुंतवणूक केल्यास 15 वर्षांनंतर आपल्याला 21 लाख रुपये मिळतात
कसा मिळणार 21 लाख रुपयांचा फायदा- जर आपण दैनंदिन व्यवहारातील 200 रुपये वाचवून गुंतवणूक केल्यास 6 हजार रुपये महिन्याला जमा होतात. अशा प्रकारे वर्षाला 72000 रुपयांची बचत होते. 15 वर्षांपर्यंत आपली एकूण गुंतवणूक 10.80 लाख रुपये होईल. पीपीएफवर 8 टक्के वार्षिक व्याज मिळतं. 15 वर्षांपर्यंत आपल्याला या रकमेवर व्याजासकट 21 लाख रुपयांचा परतावा मिळतो. म्हणजेच 15 वर्षांसाठी गुंतवलेल्या 10.31 लाख रुपयांवर व्याज मिळून 21 लाख रुपये मिळतात. 


पीपीएफ योजनेचे फायदे- पीपीएफ खात्याला एक प्रकारचं संरक्षण कवच प्राप्त असतं. यात आपल्याला नॉमिनी लावण्याची सुविधा मिळते. इन्कम टॅक्स अॅक्ट 80Cच्या तरतुदीअंतर्गत करातूनही सूट मिळते. या योजनेंतर्गत गुंतवलेल्या पैशांवर प्राप्तिकर लागत नाही. तसेच तीन वार्षिक वर्षानंतर आपण या खात्यावरून कर्जही घेऊ शकतो. 

Web Title: saving and current account post office how open accounts indian post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.