Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्सची प. बंगालमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक

रिलायन्सची प. बंगालमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक

प. बंगालमध्ये ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:46 AM2018-01-17T02:46:38+5:302018-01-17T02:46:56+5:30

प. बंगालमध्ये ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली

RPL 5000 crores investment in Bengal | रिलायन्सची प. बंगालमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक

रिलायन्सची प. बंगालमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक

कोलकाता : प. बंगालमध्ये ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली. राज्यात मोबाईल फोन आणि सेट टॉप बॉक्स उत्पादन प्रकल्प उभारण्याचा कंपनीचा विचार असल्याचे अंबानी यांनी सांगितले.
बंगाल जागतिक व्यवसाय शिखर परिषदेत अंबानी यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली ‘वेस्ट बेंगॉल बेस्ट बेंगॉल’ बनत आहे. ममता दिदीमुळेच आम्ही राज्यात गुंतवणूक करीत आहोत. आम्ही ४,५०० रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहोत. ही गुंतवणूक आम्ही १५ हजार कोटींपर्यंत वाढवू शकतो. प. बंगालमध्ये पायाभूत क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. आर्थिक कामगिरीच्या बाबतीत कोलकाताने मुंबईलाही मागे टाकल्याचे एका संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

Web Title: RPL 5000 crores investment in Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.