Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिओचा परिणाम; दूरसंचार क्षेत्रातील ७५ हजार लोकांनी गमावल्या नोक-या

जिओचा परिणाम; दूरसंचार क्षेत्रातील ७५ हजार लोकांनी गमावल्या नोक-या

दूरसंचार क्षेत्रातील ७५ हजार लोकांना गेल्या वर्षभरात नोक-या गमवाव्या लागल्या आहेत. रिलायन्स जिओच्या आगमनानंतर या क्षेत्रातील नफ्याचे प्रमाण खूपच घटले असून, त्याचा फटका नोकरदारांना बसला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:12 AM2017-11-16T00:12:27+5:302017-11-16T00:12:55+5:30

दूरसंचार क्षेत्रातील ७५ हजार लोकांना गेल्या वर्षभरात नोक-या गमवाव्या लागल्या आहेत. रिलायन्स जिओच्या आगमनानंतर या क्षेत्रातील नफ्याचे प्रमाण खूपच घटले असून, त्याचा फटका नोकरदारांना बसला आहे

The result of the results; 75 thousand people in the telecom sector lost their jobs | जिओचा परिणाम; दूरसंचार क्षेत्रातील ७५ हजार लोकांनी गमावल्या नोक-या

जिओचा परिणाम; दूरसंचार क्षेत्रातील ७५ हजार लोकांनी गमावल्या नोक-या

मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील ७५ हजार लोकांना गेल्या वर्षभरात नोकºया गमवाव्या लागल्या आहेत. रिलायन्स जिओच्या आगमनानंतर या क्षेत्रातील नफ्याचे प्रमाण खूपच घटले असून, त्याचा फटका नोकरदारांना बसला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
संशोधन संस्था एमा पार्टनर्सचे एक भागीदार ए. रामचंद्रन यांनी सांगितले की, वर्षभरापूर्वी ३ लाख कर्मचारी दूरसंचार क्षेत्रात काम करीत होते.
व्हेंडर कंपन्यांमधील ३५ ते ४0 टक्के कर्मचा-यांनी हे क्षेत्र सोडले आहे. आॅपरेटरांनी २५ ते ३0 टक्के कर्मचारी कपात केली आहे.
सध्या क्षेत्रात २.२५ लाख कर्मचारी काम करीत आहेत. या क्षेत्रातील संकटाला आता कुठे सुरुवात झाली आहे.
विलीनीकरण प्रक्रियेनंतर आणखी नोक-या जातील.
मध्यमवयीन तसेच वरिष्ठ पातळीवर काम करणा-या कर्मचा-यांना याचा सर्वाधिक फटका बसेल, असे जाणकारांना वाटते.
एबीसी कन्सल्टंटसचे कार्यकारी संचालक विवेक मेहता यांनी सांगितले की, दूरसंचार क्षेत्रातील 50 % कर्मचारी मध्यम व्यवस्थापक आहेत.
नोकरी गमावलेल्या अथवा ज्यांना सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे, अशा कर्मचाºयांत 30 % कर्मचारी याच श्रेणीतील आहेत.
या लोकांना अन्य क्षेत्रात नोक-या मिळणे कठीण आहे. विलीनीकरण प्रक्रियेनंतर आणखी 15 % लोकांच्या नोकºया जातील.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २0१७च्या जानेवारी ते एप्रिल या काळात संपूर्ण भारतीय उद्योग क्षेत्रातील १.५ दशलक्ष लोकांना नोकºया गमवाव्या लागल्या.
५ लाख कोटींचे कर्ज भारतीय दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांवर तब्बल ५ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. त्यातच गेल्या वर्षी रिलायन्स जिओचे आगमन झाल्यानंतर या क्षेत्रातील महसुलात प्रचंड घट झाली आहे.
25% कर्मचा-यांना गेल्या १२ महिन्यांत घरी बसविण्यात आले आहे. यातील बहुतांश लोकांना अल्पकालीन नोटीस देऊन घरी बसविण्यात आले. फारच थोड्या लोकांना ३ ते ६ महिन्यांचे वेतन देऊन नारळ देण्यात आला.

Web Title: The result of the results; 75 thousand people in the telecom sector lost their jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.