Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिझर्व्ह बँकेवर नामुष्की! घटवावा लागू शकते जीडीपी वाढीचे अनुमान 

रिझर्व्ह बँकेवर नामुष्की! घटवावा लागू शकते जीडीपी वाढीचे अनुमान 

रिझर्व्ह बँकेवर चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा नोंदवलेला अंदाज घटवण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:11 PM2019-01-14T22:11:30+5:302019-01-14T22:12:33+5:30

रिझर्व्ह बँकेवर चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा नोंदवलेला अंदाज घटवण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.

The Reserve Bank Decrease may be an estimate of GDP growth | रिझर्व्ह बँकेवर नामुष्की! घटवावा लागू शकते जीडीपी वाढीचे अनुमान 

रिझर्व्ह बँकेवर नामुष्की! घटवावा लागू शकते जीडीपी वाढीचे अनुमान 

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेवर चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा नोंदवलेला अंदाज घटवण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.  11 जानेवारी रोजी आयआयपीचा आकडा प्रसिद्ध झाल्यानंतर एसबीआयकॅप सिक्युरिटीज लिमिटेडने रिझर्व्ह बँकेला चालू आर्थिक वर्षासाठी नोंदवण्यात आलेला जीडीपी वाढीचा अंदाज घटवावा लागू शकतो, असे आपल्या अहवालात नमूद केले आहे.  

 आयआयपी वाढीचा आकडा अंदाजित 3.6 टक्क्यांऐवजी अत्यल्प म्हणजे 0.5 टक्के एवढाच राहिला आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार एसबीआयकॅप सिक्यॉरिटीज लिमिटेडने आपल्या अहवालामध्ये सांगितले की, रिझर्व्ह बँकेला चालू आर्थिक वर्षासाठीचा जीडीपीचा दर 7.4 वरून घटवून 7 टक्क्यांवर  आणण्याची गरज आहे. 

एसपीआय कॅपचे अर्थशास्त्रज्ञ अर्जुन नागराजन आणि अमोल भोईर यांना सांगितले की, ''मुद्रा नीती समितीचे सदस्य यथार्थवादी दृष्टीकोन अवलंबतील आणि देशांतर्गत विकासामध्ये झालेल्या घटीला आपल्या निर्णयांमध्ये स्थान देतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीकडे पाहून सदस्यांनी विकासदराच्या अनुमानाचा पुनर्विचार केला पाहिजे. 

Web Title: The Reserve Bank Decrease may be an estimate of GDP growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.