Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानींच्या मदतीला धावले मुकेश अंबानी, तोट्यातील आरकॉमला रिलायन्स जिओ तारणार

अनिल अंबानींच्या मदतीला धावले मुकेश अंबानी, तोट्यातील आरकॉमला रिलायन्स जिओ तारणार

अनिल अंबानी यांच्या तोट्यातील ‘आरकॉम’ कंपनीची अखेर मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओच खरेदी करणार आहे. त्यासंबंधीची दोन स्तरिय प्रक्रिया पूर्णही झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 03:56 AM2017-12-29T03:56:17+5:302017-12-29T11:08:49+5:30

अनिल अंबानी यांच्या तोट्यातील ‘आरकॉम’ कंपनीची अखेर मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओच खरेदी करणार आहे. त्यासंबंधीची दोन स्तरिय प्रक्रिया पूर्णही झाली आहे.

Reliance Communications to save RCom from loss | अनिल अंबानींच्या मदतीला धावले मुकेश अंबानी, तोट्यातील आरकॉमला रिलायन्स जिओ तारणार

अनिल अंबानींच्या मदतीला धावले मुकेश अंबानी, तोट्यातील आरकॉमला रिलायन्स जिओ तारणार

चिन्मय काळे 
मुंबई : अनिल अंबानी यांच्या तोट्यातील ‘आरकॉम’ कंपनीची अखेर मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओच खरेदी करणार आहे. त्यासंबंधीची दोन स्तरिय प्रक्रिया पूर्णही झाली आहे. तोट्यातील रिलायन्स कम्युनिकेशन्सची (आरकॉम) विक्री करण्याची घोषणा अनिल अंबानी यांनी मंगळवारी केली. या घोषणेच्या अवघ्या ४८ तासांतच मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडकडून (आरजेआयएल) खरेदी केली जाईल, असे जाहीर करण्यात आले. कंपनीकडून प्राप्त माहितीनुसार, आरकॉमने त्यांच्या संपत्तींच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर आरजेआयएलने एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेडची ही संपत्ती खरेदी करण्यासाठी नियुक्ती केली. कंपनीने त्याअंतर्गत विक्रीचे दोन टप्पे पूर्ण केले आहेत. जिओकडून याअंतर्गत आरकॉमचे टॉवर्स, फायबर आॅप्टिक केबलचे जाळे, स्पेक्ट्रम व मीडिया कन्वर्जन्स नोड्सची खरेदी केली जाणार आहे. मात्र सध्या केवळ प्रक्रिया सुरू आहे. सरकारी संबंधित नियंत्रण प्राधिकरणांच्या मंजुरीनंतरच ही खरेदी पूर्ण होऊ शकेल व त्यानंतरच योग्य वेळी याबाबतची माहिती जाहीर केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आरजेआयएलद्वारे सध्या देशभरात जिओ मोबाइल सेवा दिली जाते. आरकॉमच्या संपत्तीत मोबाइल नेटवर्कसाठी लागणाºया सामग्रीचाच समावेश आहे. यामुळेच जिओने यासाठी पुढाकार घेतला, असे सांगण्यात आले आहे.
>समभाग भरारीकडे ?
कंपनी तोट्यात गेल्याने आरकॉमचे समभाग १० रुपयांच्या खाली घसरले होते. त्यानंतर ते १७ रुपयांपर्यंत वधारले.
मात्र अनिल अंबानी यांच्या मंगळवारच्या घोषणेनंतर हे समभाग २३ रुपयांपर्यंत वधारले. तर गुरुवारी ही बातमी बाहेर येताच त्याची किंमत ३१ वर गेली.
आता जसजशी ही प्रक्रिया पुढे जाईल तसतसे आरकॉमचे शेअर्स भरारी घेऊ शकतात, असे संबंधित तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Reliance Communications to save RCom from loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.