Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअर इंडिया सुधारण्यासाठी प्रोफेशनल्स भरती करणार, प्रभूंची माहिती

एअर इंडिया सुधारण्यासाठी प्रोफेशनल्स भरती करणार, प्रभूंची माहिती

नवी दिल्ली : एअर इंडियाची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार आता जगभरातील निवडक प्रोफेशनल्सची (व्यावसायिक )नियुक्ती करण्याची योजना आखत आहे. यासाठी ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 04:12 AM2018-12-31T04:12:36+5:302018-12-31T04:12:50+5:30

नवी दिल्ली : एअर इंडियाची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार आता जगभरातील निवडक प्रोफेशनल्सची (व्यावसायिक )नियुक्ती करण्याची योजना आखत आहे. यासाठी ...

To recruit professionals to improve Air India, Lord Info | एअर इंडिया सुधारण्यासाठी प्रोफेशनल्स भरती करणार, प्रभूंची माहिती

एअर इंडिया सुधारण्यासाठी प्रोफेशनल्स भरती करणार, प्रभूंची माहिती

नवी दिल्ली : एअर इंडियाची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार आता जगभरातील निवडक प्रोफेशनल्सची (व्यावसायिक )नियुक्ती करण्याची योजना आखत आहे. यासाठी जागतिक पातळीवर तपासाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. नागरी विमान उड्डयण मंत्री सुरेश प्रभू यांनी ही माहिती दिली.
एअर इंडियाची भागीदारी विक्री करण्याची योजना या वर्षात अपयशी ठरल्यानंतर सरकारने आता विविध उपाययोजनांवर काम सुरु केले आहे. एअर इंडियाचे व्यवस्थापन व्यावसायिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यास सरकार प्रयत्न करत आहे.
सुरेश प्रभू यांनी वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले की, एअर इंडियासाठी प्रोफेशनल्स नियुक्त करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर शोध प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. एअर इंडियातील विविध वरिष्ठ पदे जागतिक स्तरावर शोध घेऊन भरली जातील. सरकार या प्रस्तावावर विचार करत आहे. सूत्रांनी सांगितले की, एक शोध समिती यासाठी तयार करण्यात येणार आहे. जगातील विमान क्षेत्रातील दिग्गज व्यावसायिकांना एअर इंडियात आणण्यासाठी ही समिती काम करेल.
सध्या नागरी विमान मंत्रालयाच्या दोन अधिकाऱ्यांसह एअर इंडियाच्या संचालक मंडळात ९ सदस्य आहेत. यात वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर, आयटीसीचे अध्यक्ष वाय. सी. देवेश्वर आणि आदित्य बिर्ला गु्रपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला स्वतंत्र संचालक आहेत.

५५ हजार कोटींचे कर्ज
राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियावर ५५ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. एअर इंडिया २९ हजार कोटींचे कर्ज विशेष शाखेला स्थानांतरित करणार आहे. नागरी विमान मंत्र्यांनी २७ डिसेंबर रोजी लोकसभेत सांगितले होते की, सरकारने एअर इंडियाचे सक्षमीकरण करण्यास योजना तयार केली आहे.

Web Title: To recruit professionals to improve Air India, Lord Info

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.