lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी उलाढाल, ५०९ ट्रक आवक

सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी उलाढाल, ५०९ ट्रक आवक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ५८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीचा विक्रम मोडला़ शनिवारी दिवसभरात ५०९ ट्रकमधून १ लाख १ हजार ९२२ पिशव्या कांद्याची आवक होऊन, १२ कोटी ५७ लाख ८१ हजार ७२५ रुपयांची उलाढाल झाली. कमाल ४ हजार रुपये उच्चांकी दर मिळाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:17 AM2017-12-17T00:17:53+5:302017-12-17T00:18:02+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ५८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीचा विक्रम मोडला़ शनिवारी दिवसभरात ५०९ ट्रकमधून १ लाख १ हजार ९२२ पिशव्या कांद्याची आवक होऊन, १२ कोटी ५७ लाख ८१ हजार ७२५ रुपयांची उलाढाल झाली. कमाल ४ हजार रुपये उच्चांकी दर मिळाला.

Record turnover of onions in the Solapur Bazar committee, 509 truck arrivals | सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी उलाढाल, ५०९ ट्रक आवक

सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी उलाढाल, ५०९ ट्रक आवक

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ५८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीचा विक्रम मोडला़ शनिवारी दिवसभरात ५०९ ट्रकमधून १ लाख १ हजार ९२२ पिशव्या कांद्याची आवक होऊन, १२ कोटी ५७ लाख ८१ हजार ७२५ रुपयांची उलाढाल झाली. कमाल ४ हजार रुपये उच्चांकी दर मिळाला.
४ हजार रुपये दराने २७ क्विंटल, तर किमान २०० रुपये दराने १३ क्विंटल कांद्याची विक्री झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली़ मागील काही दिवसांपासून सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक होत आहे़ यंदा कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकºयांच्या चेहºयांवर समाधान दिसत आहे़ बाजार समितीत मागील काही दिवसांपूर्वी कांदा चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ त्यानंतर, बाजार समिती प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्यामुळे, या चोºयांवर नियंत्रण मिळविण्यात बाजार समिती प्रशासनाला यश मिळाले असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांनी दिली़

शेतकरी समाधानी
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, तुळजापूर, उस्मानाबाद येथून काद्यांची आवक होत आहे़ चांगला भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत.

Web Title: Record turnover of onions in the Solapur Bazar committee, 509 truck arrivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा