Lokmat Money > बिझनेस न्यूज > जुनी नाणी स्वीकारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बँकांना आदेश

जुनी नाणी स्वीकारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बँकांना आदेश

कांनी 10 रुपयांची जुनी नाणी स्वीकारावीत, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिले आहेत.  ग्राहकांकडून कोणतंही नाणं घेण्यास बँक नाकारू शकत नाही. त्याप्रमाणेच आदेशांचं उल्लंघन केल्यास त्यांना दंडही ठोठावला जाईल, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आहे. बँका कोणतीही जुनी नाणी स्वीकारण्यासाठी नकार देऊ शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 03:55 PM2018-02-16T15:55:13+5:302018-02-16T15:55:27+5:30

कांनी 10 रुपयांची जुनी नाणी स्वीकारावीत, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिले आहेत.  ग्राहकांकडून कोणतंही नाणं घेण्यास बँक नाकारू शकत नाही. त्याप्रमाणेच आदेशांचं उल्लंघन केल्यास त्यांना दंडही ठोठावला जाईल, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आहे. बँका कोणतीही जुनी नाणी स्वीकारण्यासाठी नकार देऊ शकत नाही

Receipt of old coins, orders for banks of RBI | जुनी नाणी स्वीकारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बँकांना आदेश

जुनी नाणी स्वीकारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बँकांना आदेश

नवी दिल्ली- बँकांनी 10 रुपयांची जुनी नाणी स्वीकारावीत, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिले आहेत.  ग्राहकांकडून कोणतंही नाणं घेण्यास बँक नाकारू शकत नाही. त्याप्रमाणेच आदेशांचं उल्लंघन केल्यास त्यांना दंडही ठोठावला जाईल, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आहे. बँका कोणतीही जुनी नाणी स्वीकारण्यासाठी नकार देऊ शकत नाही. तरीसुद्धा अनेक बँकांच्या शाखांनी कमी किमतीची नाणी घेण्यास नकार दिल्याचंही समोर आलं आहे, असंही आरबीआयनं म्हटलं आहे.

एक किंवा दोन रुपयांच्या मूल्याची नाणी वजनावर घेण्यात यावीत, असंही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. पॉलिथिन सॅशेमधून 100 नाण्यांच्या ढीग दिल्यास रोखपाल आणि ग्राहक यांना दोघांनीही फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळेच बँकांच्या काऊंटरवर पॉलिथिन सॅशेमध्ये ग्राहकांना नाणी उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचनाही आरबीआयनं केली आहे. 

आदेशांचं उल्लंघन केल्यास आरबीआयकडून कारवाईही करण्यात येणार आहे. नाणी घेण्यास बँकांनी नकार दिल्यास दुकानदार किंवा छोटे व्यापारीही ग्राहकांकडून नाणी स्वीकारणार नाहीत. त्यामुळे सामान्यांची मोठी गैरसोय होईल, असं आरबीआयने सांगितलं आहे.

Web Title: Receipt of old coins, orders for banks of RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.