Lokmat Money > बिझनेस न्यूज > रियल इस्टेट पुन्हा सुधारणांच्या रुळावर; नोटाबंदी, जीएसटी आणि ‘रेरा’नंतर परिस्थितीत सकारात्मक बदल

रियल इस्टेट पुन्हा सुधारणांच्या रुळावर; नोटाबंदी, जीएसटी आणि ‘रेरा’नंतर परिस्थितीत सकारात्मक बदल

नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा (स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण) यासारख्या सुधारणांनंतर मंद झालेली रियल इस्टेट मार्केटची गती पुन्हा वाढत असल्याचे चिन्हे आहेत. देशातील बहुतांश महानगरात या क्षेत्रात विक्रीत, किंमतीत सुधारणा झाली आहे. प्रॉपर्टी पोर्टल ‘९९ एकर्स डॉट कॉम’च्या एका सर्व्हेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:02 AM2018-02-16T04:02:37+5:302018-02-16T04:02:48+5:30

नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा (स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण) यासारख्या सुधारणांनंतर मंद झालेली रियल इस्टेट मार्केटची गती पुन्हा वाढत असल्याचे चिन्हे आहेत. देशातील बहुतांश महानगरात या क्षेत्रात विक्रीत, किंमतीत सुधारणा झाली आहे. प्रॉपर्टी पोर्टल ‘९९ एकर्स डॉट कॉम’च्या एका सर्व्हेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

Real estate reforms; Positive change in the situation after the breakout, GST and 'Rara' | रियल इस्टेट पुन्हा सुधारणांच्या रुळावर; नोटाबंदी, जीएसटी आणि ‘रेरा’नंतर परिस्थितीत सकारात्मक बदल

रियल इस्टेट पुन्हा सुधारणांच्या रुळावर; नोटाबंदी, जीएसटी आणि ‘रेरा’नंतर परिस्थितीत सकारात्मक बदल

मुंबई : नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा (स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण) यासारख्या सुधारणांनंतर मंद झालेली रियल इस्टेट मार्केटची गती पुन्हा वाढत असल्याचे चिन्हे आहेत. देशातील बहुतांश महानगरात या क्षेत्रात विक्रीत, किंमतीत सुधारणा झाली आहे. प्रॉपर्टी पोर्टल ‘९९ एकर्स डॉट कॉम’च्या एका सर्व्हेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी किंमती कमी झालेल्या असल्या तरी, बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी विक्री वाढली आहे.
या सर्व्हेक्षणानुसार, पुणे, मुंबई आणि बंगळुरु यासारख्या शहरात रियल इस्टेट क्षेत्रात सकारात्मक परिस्थिती आहे. येथे विक्रीमध्ये वाढ पहायला मिळत आहे. हैदराबाद आणि कोलकाता यासारख्या शहरात आॅक्टोबर-डिसेंबर २०१७ च्या तिमाहीत किरायात ४ टक्के वाढ झाली आहे.
याच काळात २०१६ मध्ये बंगळुरु आणि मुंबईत विक्रमी ३ टक्के वाढ नोंदविण्यात आली होती.
या अहवालात असेही म्हटले आहे की, गुडगाव, नोएडा आणि नवी मुंबई या भागातही काही लोकप्रिय निवासी भागात मागणी वाढत आहे. रियल इस्टेट क्षेत्रात २०१७ मध्ये काही महत्वपूर्ण सुधारणा झाल्या. रेरा आणि जीएसटी याचा परिणामही या क्षेत्रावर झाला. काही भागात त्यामुळे रियल इस्टेट क्षेत्रात नकारात्मक परिणाम दिसून आले. ‘९९ एकर्स डॉट कॉम’चे मुख्य व्यवसाय अधिकारी नरसिम्हा जयकुमार यांनी सांगितले की,
२०१७ च्या पहिल्या सहामाहीत घसरण दिसून आली. तर, दुसºया सहामाहीत या क्षेत्रातील भागधारकात चिंता दिसून आली.

किमती कमी होतील

- रियल इस्टेट क्षेत्रात विचारपूस आणि विक्री वाढली. बंगळुरु आणि पुणे यासारख्या शहरात सुधारणा दिसून आली.
जीएसटीतील स्पष्टतेमुळे या क्षेत्रात आणखी सुधारणा होऊ शकतात. २०१८ मध्ये लक्झरी क्षेणीतील किंमती कमी होऊ शकतात.

Web Title: Real estate reforms; Positive change in the situation after the breakout, GST and 'Rara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.