आरबीआयची कारवाई : नियम मोडल्याबद्दल एसबीआयला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, March 09, 2018 3:07am

बनावट नोटा शोधणे आणि जप्त करणे याबाबतच्या नियमांची पायमल्ली केल्याच्या आरोपावरून स्टेट बँक आॅफ इंडियाला (एसबीआय) रिझर्व्ह बँकेने ४0 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अशी कारवाई होणारी गेल्या काही दिवसांतील ही तिसरी बँक ठरली आहे.

Open in App

नवी दिल्ली - बनावट नोटा शोधणे आणि जप्त करणे याबाबतच्या नियमांची पायमल्ली केल्याच्या आरोपावरून स्टेट बँक आॅफ इंडियाला (एसबीआय) रिझर्व्ह बँकेने ४0 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अशी कारवाई होणारी गेल्या काही दिवसांतील ही तिसरी बँक ठरली आहे. रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. निवेदनात म्हटले आहे की, बनावट नोटा शोधणे आणि जप्त करणे यासंबंधी काही नियम रिझर्व्ह बँकेने जारी केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी न केल्याबद्दल एसबीआयला १ मार्च २0१८ रोजी ४ दशलक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. बनावट नोटांसंबंधीच्या नियमांबाबत एसबीआयमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. निवेदनातील माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने एसबीआयच्या दोन शाखांतील तिजोºयांची तपासणी केली, तेव्हा बनावट नोटांसंबंधीचे नियम बँकेकडून पाळले जात नसल्याचे आढळून आले. तपासणी अहवाल व अन्य संदर्भित दस्तावेज यांच्या आधारे एसबीआयला ५ जानेवारी २0१८ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. आपल्यावर दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा बँकेकडे करण्यात आली होती. त्यावर बँकेने उत्तरही सादर केले होते. काही तोंडी म्हणणेही मांडण्यात आले होते. बँकेला वैयक्तिक सुनावणीची संधीही देण्यात आली. बँकेने सादर केलेल्या बाजूवर पूर्ण विचार केल्यानंतरही रिझर्व्ह बँकेला आढळून आले की, नियमांची पायमल्ली केल्याचा बँकेवरील आरोप पुसला जात नाही. या प्रकरणी योग्य कारवाई होणे आवश्यकच ठरते. त्यानंतर बँकेला आर्थिक दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. कारवाईनंतर समभाग घसरले रिझर्व्ह बँकेच्या कारवाईचे वृत्त आल्यानंतर गुरुवारी एसबीआयचे समभाग घसरले. सोमवारी रिझर्व्ह बँकेने अ‍ॅक्सिस बँकेला ३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. अनुत्पादक भांडवलाच्या वर्गीकरणविषयक नियमांचे पालन न केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. तसेच केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल इंडियन ओव्हरसीज बँकेला २ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

Open in App

संबंधित

व्याजदरात घट, कर्ज होणार स्वस्त; शेतकऱ्यांना विनातारण १.६ लाख
शेतकऱ्यांसाठी आरबीआयची खुशखबर...विनातारण कर्ज मर्यादा 60 हजारांनी वाढली
आता काहीही तारण न ठेवता मिळणार एवढं कर्ज, RBIची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात; बँकांचे हप्ते कमी होणार
चलनात एक लाख काेटी किंमतीच्या बेहिशोबी नोटा; विश्वास उटगी यांचा आरोप 

व्यापार कडून आणखी

स्पाइसजेटची १४ उड्डाणे रद्द; मॅक्स ७ विमानांवर बंदी
SBIचा खबरदारीचा इशारा; 'या' व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून राहा सावधान! 
औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि.वर आता महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लि.ची मालकी
आर्थिक स्थिती बिघडल्याने जेट एअरवेजने एतिहादकडे मागितले ७५० कोटी रुपये
1 एप्रिलपासून घरं स्वस्त होणार, तब्बल पाच लाख रुपये वाचणार

आणखी वाचा