Lokmat Money > बिझनेस न्यूज > 200हून जास्त बॅड लोन अकाऊंट्सवर RBIचा 'तिसरा' डोळा

200हून जास्त बॅड लोन अकाऊंट्सवर RBIचा 'तिसरा' डोळा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जवळपास 200 बॅड लोन अकाऊंट्सची चौकशी करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 10:34 AM2018-08-14T10:34:40+5:302018-08-14T10:35:03+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जवळपास 200 बॅड लोन अकाऊंट्सची चौकशी करत आहेत.

RBI 'third' eye on more than 200 bad loan accounts | 200हून जास्त बॅड लोन अकाऊंट्सवर RBIचा 'तिसरा' डोळा

200हून जास्त बॅड लोन अकाऊंट्सवर RBIचा 'तिसरा' डोळा

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जवळपास 200 बॅड लोन अकाऊंट्सची चौकशी करत आहेत. 2011तल्या या बँक खात्यांचा आता आरबीआयकडून तपास केला जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बँकरप्सी न्यायालयात डेट रेझॉल्युशन काही गोंधळ झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर आरबीयआनं त्या खात्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांमध्ये व्हिडीओकॉन, एस्सार स्टील, एबीजी शिपयार्ड, भूषण स्टील आणि मॉनेट इस्पातच्या अकाऊंट्सचा समावेश आहे.

तसेच आरबीआय इतर गोष्टींसह रिपेमेंट हिस्ट्री, क्लासिफिकेशन्स, प्रोव्हिजन्स आणि डेट रिस्ट्रक्चरिंगवरही नजर ठेवून आहे. तसेच त्या कंपन्यांनी सर्व प्रक्रियांचं पालन केलं आहे का, याचीही आरबीआय माहिती घेत आहे. आरबीआयनं अनेक संशयित खात्यांसंदर्भातील माहिती बँकेकडून मागवली आहे. बँकांनी त्या विविध खात्यांना कशा प्रकारे कर्ज दिले आहे, याचा आढावा आरबीआय घेत आहे. रेग्युलेटर दर वर्षी विविध बँकांमधील खात्यांची चौकशी करतो. त्याच्या पार्श्वभूमीवर आरबीआय बॅड लोन काऊंट्सची चौकशी करत आहे, असंही एका अधिका-यानं सांगितलं आहे.

बँक खात्याशी आधार कार्ड जोडणं आवश्यक - आरबीआय
गेल्या वर्षभरात बँकांमध्ये 30 हजार कोटींचे घोटाळे- आरबीआय

गेल्या काही दिवसांपूर्वी आरबीआयनं फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट (एफएसआर) प्रसिद्ध केला होता. '2017-18 या आर्थिक वर्षात बँकिंग व्यवस्थेतील 6 हजार 500 घोटाळे झाल्याचं त्या अहवालातून समोर आलं होतं. या घोटाळ्यांचं मूल्य 30 हजार कोटी रुपये इतकं होतं', अशी आकडेवारी या अहवालात आहे. 'गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग व्यवस्थेत 1 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या घोटाळ्यांचं प्रमाण वाढलं आहे. बँकिंग व्यवस्थेतील घोटाळ्यांची संख्याच वाढली नसून घोटाळ्याचं मूल्यदेखील प्रचंड प्रमाणात वाढलं आहे,' असं आरबीआयनं अहवालात नमूद केलं होतं. 

सरकारी बँकांमधील घोटाळ्यांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं आरबीआयचा अहवाल सांगतो. एकूण घोटाळ्यांपैकी 85 टक्के घोटाळे सरकारी बँकांमध्ये झाले आहेत. 2018 मध्ये झालेल्या सर्वाधिक 10 घोटाळे पाहिल्यास, केवळ या 10 घोटाळ्यांमुळे बँकांना तब्बल 10 हजार कोटींचा चुना लावण्यात आला आहे. फसवणूक करुन घेतल्या जाणाऱ्या कर्जातून सर्वाधिक घोटाळे होतात, असं अहवालात अधोरेखित करण्यात आलं आहे. 

Web Title: RBI 'third' eye on more than 200 bad loan accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.