Lokmat Money > बिझनेस न्यूज > आरबीआयचे घूमजाव? इतर बँकांना करोडोच्या रकमा कोण परत करणार?

आरबीआयचे घूमजाव? इतर बँकांना करोडोच्या रकमा कोण परत करणार?

नीरव मोदीसह अन्य तिघांनी पंजाब नॅशनल बँकेच्या लेटर आॅफ अंडरटेकिंगच्या आधारे ११, ५०० कोटी रुपये स्वत:कडे वळते केले. ही रक्कम पीएनबीच्या नावाखाली अन्य बँकांकडून आरोपींकडे गेली. मात्र ती रक्कम अन्य बँकांची होती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:54 AM2018-02-17T00:54:00+5:302018-02-17T00:54:35+5:30

नीरव मोदीसह अन्य तिघांनी पंजाब नॅशनल बँकेच्या लेटर आॅफ अंडरटेकिंगच्या आधारे ११, ५०० कोटी रुपये स्वत:कडे वळते केले. ही रक्कम पीएनबीच्या नावाखाली अन्य बँकांकडून आरोपींकडे गेली. मात्र ती रक्कम अन्य बँकांची होती.

Rbi roaming? Who will return the billions of crores to other banks? | आरबीआयचे घूमजाव? इतर बँकांना करोडोच्या रकमा कोण परत करणार?

आरबीआयचे घूमजाव? इतर बँकांना करोडोच्या रकमा कोण परत करणार?

मुंबई : नीरव मोदीसह अन्य तिघांनी पंजाब नॅशनल बँकेच्या लेटर आॅफ अंडरटेकिंगच्या आधारे ११, ५०० कोटी रुपये स्वत:कडे वळते केले. ही रक्कम पीएनबीच्या नावाखाली अन्य बँकांकडून आरोपींकडे गेली. मात्र ती रक्कम अन्य बँकांची होती. त्यामुळे या रकमेची जबाबदारी पीएनबीचीच आहे, अशी भूमिका रिझर्व्ह बँकेने घेतल्याचे समजते. त्यामुळे या रकमा पीएनबीने अन्य बँकांना द्याव्यात, असेच संबंधित बँकांचे म्हणणे आहे. आरबीआयने तसे आदेश पीएनबीला दिल्याची चर्चा होती. असे आदेश दिले नाहीत, असे आरबीआयने स्पष्ट केले. पीएनबीने रक्कम न दिल्यास अन्य ३० बँकाही अडचणीत येतील. वित्तीय गोंधळ निर्माण होईल, अशी भीती आरबीआयला वाटत आहे.

बँकांची अपेक्षा
वाढत्या एनपीएमुळे सर्वच बँका संकटात आहेत. त्यात पीएनबीचाही समावेश आहेच. बँकेकडे निधीची कमतरता आहे. अशा वेळी अन्य बँकांना ११,५०० कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचे सरकारने हस्तक्षेप करावा, अशी पीएनबीची अपेक्षा आहे.

- तुमच्या हमीवर बँकांनी नीरव मोदीला कर्ज दिले. त्यामुळे तुम्ही ती रक्कम संबंधित बँकांना परत करा, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने पीएनबीला दिल्याचे वृत्त होते. पण असे आदेश दिले नसल्याचे आरबीआयने रात्री जाहीर केले.

Web Title: Rbi roaming? Who will return the billions of crores to other banks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.