lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर! आता बँका झिरो बॅलन्सवाल्या खातेधारकांनाही देणार 'या' सुविधा मोफत, RBIचा आदेश

खूशखबर! आता बँका झिरो बॅलन्सवाल्या खातेधारकांनाही देणार 'या' सुविधा मोफत, RBIचा आदेश

बेसिक सेव्हिंग बँक अकाऊंट (बीएसबीडी) ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 12:34 PM2019-06-11T12:34:51+5:302019-06-11T12:35:13+5:30

बेसिक सेव्हिंग बँक अकाऊंट (बीएसबीडी) ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

rbi change bsbd account rule relaxes norms of no frills accounts | खूशखबर! आता बँका झिरो बॅलन्सवाल्या खातेधारकांनाही देणार 'या' सुविधा मोफत, RBIचा आदेश

खूशखबर! आता बँका झिरो बॅलन्सवाल्या खातेधारकांनाही देणार 'या' सुविधा मोफत, RBIचा आदेश

नवी दिल्लीः बेसिक सेव्हिंग बँक अकाऊंट (बीएसबीडी) ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँके(RBI)नं खातेधारकांना काही नियमांमधून सूट दिली आहे. त्यामुळे आता खातेधारकांना चेकबुक आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे अशी सुविधा पुरविताना बँक कोणतीही अट ठेवू शकत नाही. म्हणजेच झिरो बॅलन्सवाल्या खातेधारकांनाही बँकेला या सुविधा उपलब्ध करून द्यावा लागणार आहेत.

बेसिक सेव्हिंग बँक अकाऊंट (बीएसबीडी) हे झिरो बॅलन्समध्ये उघडता येते. तसेच या खात्यात अमुक एवढी रक्कम ठेवावी, असं कोणतंही बंधन नसतं. प्राथमिक बचत खात्याच्या स्वरूपात बीएसबीडी हे खातं उघडलं जातं. यात झिरो बॅलन्सपासून खातं उघडता येते. तत्पूर्वी नियमित व्यवहार सुरळीत असलेल्या बचत खात्यांनाच अशी सुविधा मिळत होती, परंतु आता झिरो बॅलन्सवाल्या खात्यांनाही अशी सुविधा प्राप्त होणार आहे. 

  • आता मिळणार या सुविधा मोफत

आरबीयआनं बँकांना बचत खात्याच्या स्वरूपात बीएसबीडी खातं उघडण्याची सुविधा दिली आहे. यात कोणत्याही शुल्काशिवाय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, बँकेत किमान रक्कम नसली तरी त्या ग्राहकाला चेकबुक जारी करावं लागणार आहे. तसेच अतिरिक्त मूल्यवर्धित सेवांचाही त्यांना लाभ मिळवून द्यावा लागणार आहे. बँका ग्राहकांना अतिरिक्त सुविधा पुरवण्यासाठी खात्यात किमान रक्कम असण्याची अट घालू शकत नाहीत. बीएसबीडी खात्यात किमान रक्कम ठेवणं गरजेचं नाही. 

  • एटीएममधून चार वेळा मोफत काढता येणार पैसे

बीएसबीडी खात्यांच्या नियमांतर्गत आता खातेधारकांना खात्यात किमान रक्कम ठेवणं आवश्यक नाही. तसेच त्यांना एटीएममधून चार वेळा पैसे काढण्याची मुभाही देण्यात आली 

Web Title: rbi change bsbd account rule relaxes norms of no frills accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.