नवी दिल्ली : स्टेट बँक आॅफ इंडिया या देशातील सर्वांत मोठ्या सरकारी व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी सरकारने बुधवारी रजनीश कुमार यांची नियुक्ती केली. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल.
रणजीत कुमार सध्या स्टेट बँकेत चारपैकी एक व्यवस्थापकीय संचालक आहेत. विद्यमान अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य शुक्रवारी निवृत्त झाल्यावर रणजीत कुमार अध्यक्षपदी रुजू होतील. सन २०१३मध्ये बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या भट्टाचार्य गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये निवृत्त व्हायच्या होत्या. परंतु सहा सहयोगी बँकांचे व भारतीय महिला बँकेचे स्टेट बँकेतील नियोजित विलीनीकरण लक्षात घेऊन त्यांना मुदतवाढ दिली गेली होती.
रजनीश कुमार सन १९८०मध्ये ‘प्रोबेशनरी आॅफिसर’ म्हणून रुजू झाले व गेल्या ३७ वर्षांत त्यांनी बँकेत उत्तरोत्तर वरिष्ठ जबाबदारीची पदे सांभाळली. सरकारी बँकांचे प्रमुख निवडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी नियंत्रक व महालेखाकार (कॅग) यांच्या अध्यक्षतेखालील ‘बँक्स बोर्ड ब्युरो’ने स्टेट बँकेच्या अध्यक्षपदासाठी पात्र उमेदवारांच्या गेल्या एप्रिलमध्ये मुलाखती घेतल्या होत्या.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.