Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोटाबंदी अन् जीएसटी अर्थव्यवस्थेसमोरील मोठ्या समस्या- रघुराम राजन

नोटाबंदी अन् जीएसटी अर्थव्यवस्थेसमोरील मोठ्या समस्या- रघुराम राजन

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या निर्णयांवर टीका केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 08:02 PM2018-11-10T20:02:10+5:302018-11-10T20:23:53+5:30

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या निर्णयांवर टीका केली आहे.

raghuram rajan rbi indian economic growth pmo demonetization gst | नोटाबंदी अन् जीएसटी अर्थव्यवस्थेसमोरील मोठ्या समस्या- रघुराम राजन

नोटाबंदी अन् जीएसटी अर्थव्यवस्थेसमोरील मोठ्या समस्या- रघुराम राजन

वॉशिंग्टन- आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या निर्णयांवर टीका केली आहे. नोटाबंदी अन् जीएसटी हे दोन्ही निर्णय अर्थव्यवस्थेसाठी अडचण ठरले आहे. त्यामुळे विकासदर प्रभावित झाला आहे. तसेच भारतातील निर्णयांमध्ये पंतप्रधान कार्यालयाचा हस्तक्षेप हा अर्थव्यवस्थेतल्या अडचणींपैकी मोठी समस्या आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नोटाबंदी आणि जीएसटी देशाच्या आर्थिक वृद्धीतील सर्वात मोठी बाधा असल्याचं म्हटलं आहे. मोदी सरकारच्या या दोन निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. सद्य स्थितीत असलेला विकासदर हा देशांतील गरजेच्या तुलनेत पर्याप्त नाही.  कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे. 

जीएसटी ही करप्रणाली येण्याआधी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढतच होता. परंतु खनिज तेलाच्या वाढत्या दरामुळे विकासाला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज आहे. वेळीच योग्य पावलं उचलल्यास भारताचा विकासदर येत्या 10 ते 15 वर्षांमध्ये वाढू शकेल. तसेच एनपीए, पायाभूत सुविधा अन् वीज प्रश्न या भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मोठ्या समस्या असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

Web Title: raghuram rajan rbi indian economic growth pmo demonetization gst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.