Lokmat Money > बिझनेस न्यूज > विमानतळांवर खरेदी, जीएसटी नाही! परदेशी प्रवाशांसाठी नवी सुविधा

विमानतळांवर खरेदी, जीएसटी नाही! परदेशी प्रवाशांसाठी नवी सुविधा

आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना देशातील विमानतळांवरील शुल्क मुक्त दुकानातून वस्तू खरेदी करताना जीएसटी द्यावा लागणार नाही. महसूल विभाग लवकरच याबाबत स्पष्टीकरण जारी करणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:41 AM2018-06-04T00:41:13+5:302018-06-04T00:41:13+5:30

आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना देशातील विमानतळांवरील शुल्क मुक्त दुकानातून वस्तू खरेदी करताना जीएसटी द्यावा लागणार नाही. महसूल विभाग लवकरच याबाबत स्पष्टीकरण जारी करणार आहे.

 Purchase at airports, not GST! A new facility for foreign travelers | विमानतळांवर खरेदी, जीएसटी नाही! परदेशी प्रवाशांसाठी नवी सुविधा

विमानतळांवर खरेदी, जीएसटी नाही! परदेशी प्रवाशांसाठी नवी सुविधा

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना देशातील विमानतळांवरील शुल्क मुक्त दुकानातून वस्तू खरेदी करताना जीएसटी द्यावा लागणार नाही. महसूल विभाग लवकरच याबाबत स्पष्टीकरण जारी करणार आहे.
यापूर्वी आॅथेरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलींगने (एएआर) नवी दिल्लीतील एका न्यायालयात मार्चमध्ये दिलेल्या एका स्पष्टीकरणात म्हटले होते की, शुल्क मुक्त दुकानातून वस्तूंच्या विक्रीवर जीएसटी लागेल. एएआरच्या निर्णयानंतर महसूल विभागाला अनेक पत्रे मिळाले. यात परिस्थिती स्पष्ट करण्याबाबत विनंती करण्यात आली.
याबाबत अधिकाºयांनी सांगितले की, महसूल विभागाची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. आम्ही याबाबत स्पष्टीकरण जारी करुन सांगणार आहोत की, शुल्क मुक्त दुकानात जीएसटी लागणार नाही. या दुकानांनी प्रवाशांकडून केवळ पासपोर्टची प्रत घ्यावी. जेणेकरुन दुकानदार नंतर त्या वस्तूवर दिलेल्या जीएसटीच्या रिफंडसाठी दावा करु शकतील.
पासपोर्टची प्रत हा वस्तंूच्या विक्रीचा पुरावा मानला जाईल. एएआरच्या आदेशामुळे संभ्रम निर्माण झाला होता. जीएसटी व्यवस्थेपूर्वी या ठिकाणी व्हॅटमधून सूट होती.

Web Title:  Purchase at airports, not GST! A new facility for foreign travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.