lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > डाळी वगळता धान्य महाग, हे वर्ष महागाईचेच, खाद्य तेल-तांदूळ महागणार, इंधनही भडकणार

डाळी वगळता धान्य महाग, हे वर्ष महागाईचेच, खाद्य तेल-तांदूळ महागणार, इंधनही भडकणार

नववर्षाचे सा-यांनीच आनंदात स्वागत केले. पण हे नववर्ष भारतीयांसाठी तितकेसेच आनंददायी ठरण्याची चिन्हे कमी आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे २०१८ हे वर्ष महागाईचे ठरणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 02:22 AM2018-01-01T02:22:51+5:302018-01-01T02:23:08+5:30

नववर्षाचे सा-यांनीच आनंदात स्वागत केले. पण हे नववर्ष भारतीयांसाठी तितकेसेच आनंददायी ठरण्याची चिन्हे कमी आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे २०१८ हे वर्ष महागाईचे ठरणार आहे.

 The price of foodgrains, except pulses, will be more expensive, inflation of oil and rice will rise | डाळी वगळता धान्य महाग, हे वर्ष महागाईचेच, खाद्य तेल-तांदूळ महागणार, इंधनही भडकणार

डाळी वगळता धान्य महाग, हे वर्ष महागाईचेच, खाद्य तेल-तांदूळ महागणार, इंधनही भडकणार

- चिन्मय काळे
मुंबई : नववर्षाचे सा-यांनीच आनंदात स्वागत केले. पण हे नववर्ष भारतीयांसाठी तितकेसेच आनंददायी ठरण्याची चिन्हे कमी आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे २०१८ हे वर्ष महागाईचे ठरणार आहे.
इंधनाचा भडका
इंधनाचे दर हा २०१८ मध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. मागील जानेवारी महिन्यात फक्त ३६ डॉलर प्रती बॅरेलवर (१५८.९८ लिटर) असणारे कच्चे तेल २०१७ वर्षअखेरीस ५६ डॉलर प्रती बॅरेलवर पोहोचले. त्यानंतर आता यावर्षी हा दर मार्च महिन्यातच ६८ डॉलरपर्यंत वधारण्याचा इशारा तेल उत्पादक देशांनी (ओपेक) दिला आहे. एका डॉलरचा दर साधरण ६८ रुपयांदरम्यान आहे. त्यानुसार कच्चे तेल २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यातच ८१६ रूपये प्रती बॅरेलने (सुमारे साडे पाच रूपये प्रती लिटर) वधारण्याचा अंदाज आहे. त्यावरील प्रक्रियेचा खर्च पकडून देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर येत्या तीन महिन्यातच ५ ते ७ रूपयांनी वाढण्याची शक्यता आहे. एका पेट्रोल-डिझेल वाढले की वाहतुकीचा खर्च व त्यातून सर्वच वस्तू महागतात.
भात वाढविणार खर्च
नॅशनल बल्क हॅण्डलिंग कॉर्पोरेशनच्या (एनबीएफसी) संशोधन व विकास विभागाचे प्रमुख डॉ. हनीशकुमार सिन्हा यांच्यानुसार, २०१७ मध्ये तांदळाचे पिक मागीलवर्षीपेक्षा किंचीत वाढले आहे. त्यात केवळ २.५३ टक्क्यांची वाढ आहे. मात्र अंदाजित उत्पादनापेक्षा त्यात ०.१४ टक्के घट झाली आहे. त्याचवेळी बासमती तांदळाच्या उत्पादनात २५ ते २८ टक्क्यांची मोठी घट झाली आहे. यामुळे अन्य तांदळाची मागणी वाढेल. परिणामी तांदळाचे दर वाढण्याचा अंदाज आहे.
सोयाबिन उत्पादनात घट
सोयाबिनचे नवीन पिक आता बाजारात येऊ घातले आहे. मागीलवर्षी देशभरात १.४२ कोटी टन पिक आले होते. त्यामध्ये यंदा जवळपास २७ टक्क्यांची घट झाली आहे. यंदा केवळ १.०४ कोटी टन सोयाबिन पिकाचा येईल. याचा परिणाम होऊन सोयाबिन तेल महागण्याचा अंदाज आहे. सोयाबिन हे सर्वाधिक मागणीचे तेल असल्याने ते महागले की अन्य सर्वच तेलांवर त्याचा परिणाम होत असतो. त्यातून यंदा तेलाचे दर सर्वसामान्यांच्या खिषाला चाट देण्याची शक्यता आहे.
दिलासा तूरडाळीचा
२०१५ मध्ये तूरडाळीने सर्वसामान्यांना रडवले होते. सरकारने २०१६ मध्ये नियोजन करुन तुरीचे पिक वाढवले. परिणामी २०१७ मध्ये तूरडाळ स्वस्त झाली. आता हाच दिलासा सर्वसामान्यांना यावर्षीही मिळणार आहे. २०१७ मध्ये तुरीच्या पिकात ९.८७ टक्के वाढ होऊन ते जवळपास ४० लाख टनाच्या घरात पोहोचले आहे. तुरडाळीची मागणी ३० लाख टनाच्या घरात असते. आता तूरडाळीवर निर्यातबंदी नसली तरी पिक मुबलक असल्याचे दर घसरतील, हे नक्की.

शेअर बाजारात ‘बुल रन’ पण...\

आरकॉमला रिलयान्स जिओ खरेदी करण्याच्या निमित्ताने वर्ष संपता-संपता शेअर बाजारात चांगलाच उत्साह होता. २०१८ च्या पहिल्या तिमाहीत ३४ हजाराचा टप्पा पार करण्याची शक्यता असलेल्या सेनसेक्सने डिसेंबर २०१७ मध्येच हा टप्पा पार गेला. त्यामुळे आता हे वर्ष शेअर बाजारासाठी सकारात्मकच असेल. बाजारात ‘बुल रन’ असेलच, पण देशांतर्गत महागाई, त्यातून कमी झालेली क्रयशक्ती आणि अर्थव्यवस्थेतील शिथीलता यांचा परिणामही बाजारावर होण्याची शक्यता आहे.

‘डाळींचे वाढलेले पिक आणि बासमती तसेच सोयाबिनच्या पिकात झालेली घट, हे चित्र एकीकडे असले तरी कापसाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. कापूस उत्पादन क्षेत्रातील पूरस्थितीचा कापसावर परिणाम झाला आहे. उत्पादनात १२.४५ टक्के घट झाली आहे. याचा परिणाम शेतीच्या आर्थिक गणितावर होईल, असा अंदाज आहे.’
डॉ. हनीश कुमार सिन्हा
प्रमुख, संशोधन व विकास विभाग, एनबीएफसी

Web Title:  The price of foodgrains, except pulses, will be more expensive, inflation of oil and rice will rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.