Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोस्टातून तुम्हाला मिळतायत 'या' सुविधा, विजेचं बिल येणार निम्म्यावर

पोस्टातून तुम्हाला मिळतायत 'या' सुविधा, विजेचं बिल येणार निम्म्यावर

पोस्ट ऑफिसनं तुमच्यासाठी काही खास योजना आणल्या आहेत. आता पोस्टात तुम्हाला एलईडी बल्ब, एलईडी ट्युब मिळणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 06:33 PM2018-10-14T18:33:18+5:302018-10-14T18:33:36+5:30

पोस्ट ऑफिसनं तुमच्यासाठी काही खास योजना आणल्या आहेत. आता पोस्टात तुम्हाला एलईडी बल्ब, एलईडी ट्युब मिळणार आहेत.

post office will give led bulb and fan to customers | पोस्टातून तुम्हाला मिळतायत 'या' सुविधा, विजेचं बिल येणार निम्म्यावर

पोस्टातून तुम्हाला मिळतायत 'या' सुविधा, विजेचं बिल येणार निम्म्यावर

नवी दिल्ली- पोस्ट ऑफिसनं तुमच्यासाठी काही खास योजना आणल्या आहेत. आता पोस्टात तुम्हाला एलईडी बल्ब, एलईडी ट्युब मिळणार आहेत. ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड(EESL) या कंपनीनं उजाला योजनेंतर्गत पोस्ट ऑफिसबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या योजनेंतर्गत तुम्हाला पोस्टात स्वस्त किमतीत एलईडी बल्ब, एलईडी ट्युब उपलब्ध करून दिले आहेत. जेणेकरून ते घरात लावल्यास तुमचं विजेचं बिल निम्म्यावर येईल.

कंपनीच्या माहितीनुसार, उन्नत ज्योती बाय अफर्डेबल एलईडी फॉर ऑल (UJALA) अंतर्गत विजेचं बिल कमी येईल, अशी उपकरणं वितरित करण्याचा पोस्ट ऑफिसबरोबर करार झाला आहे. EESL ही कंपनी देशभरातील पोस्टाच्या सर्व ऑफिसांमध्ये एलईडी बल्ब, एलईडी ट्युब आणि बीईई 5-स्टार (कमी वीज वापरणारे) पंख्यांचं वितरण करणार आहे.

कमी वीज वापरणारी ही उपकरणं सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑफिसमध्ये ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर ती पोस्टाच्या इतरही ऑफिसांमध्ये वितरीत करण्यात येणार आहेत. उजाला योजनेंतर्गत देशभरात 31 कोटी एलईडी बल्ब, 66 लाख एलईडी ट्युब लाइट आणि कमी वीज वापरणारे जवळपास 20 लाख पंखे वितरीत करण्यात आले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, या उपकरणांमुळे 4,000 कोटी किलोवॉट ऊर्जेची बचत होणार आहे. 

Web Title: post office will give led bulb and fan to customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.