Lokmat Money > बिझनेस न्यूज > चोकसीचा पासपोर्ट जप्त करण्यात पोलीस अपयशी

चोकसीचा पासपोर्ट जप्त करण्यात पोलीस अपयशी

देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी या दोघांनी बँकांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आलेले असताना आता अशी माहिती मिळत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:26 AM2018-04-11T04:26:47+5:302018-04-11T04:26:47+5:30

देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी या दोघांनी बँकांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आलेले असताना आता अशी माहिती मिळत आहे

Police failure to seize Choksi passport | चोकसीचा पासपोर्ट जप्त करण्यात पोलीस अपयशी

चोकसीचा पासपोर्ट जप्त करण्यात पोलीस अपयशी

बंगळुरू : देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी या दोघांनी बँकांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आलेले असताना आता अशी माहिती मिळत आहे की, मेहुल चोकसीचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने त्या वेळी दिले होते. मात्र, चोकसीचा पासपोर्ट जप्त करण्यात पोलिसांना अपयश आले. जर पोलिसांनी तातडीने कारवाई केली असती तर आज चोकसी पळून जाऊ शकला नसता.
एका स्थानिक ज्वेलर्सने चोकसीविरुद्ध २०१५मध्ये फसवणुकीची तक्रार दिली होती. त्यावर बंगळुरू पोलिसांनी क्लोजर रिपोर्टही सादर केला होता. मात्र, चोकसीच्या जामिनासाठी पासपोर्ट जप्तीची जी मुख्य अट होती ती पोलिसांकडून पाळली नाही. बंगळुरूतील ज्वेलर्स एस. व्ही. हरिप्रसाद यांनी चोकसीविरुद्ध १०.४८ कोटींची फसवणूक केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी चोकसीविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले होते. चोकसीने हरिप्रसाद यांच्यासोबत गीतांजली ज्वेलर्स सुरू केले मात्र, चोकसीने या कराराचे पालन न करता अतिशय हलक्या दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा केला.
>सरकारी मदत नको
नवी दिल्ली : नीरव मोदी याचे १३ हजार कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण हा बँकेचा प्रश्न आहे व या प्रकरणी सरकारची मदत मागणार नाहीत, असे स्पष्टीकरण पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी दिले आहे. ते म्हणाले की, या आव्हानांना तोंड देण्यासाठी बँकांकडे पर्याप्त मनुष्यबळ आणि क्षमता आहे.

Web Title: Police failure to seize Choksi passport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.