Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्लॅस्टिकला उसाच्या लगद्याचा पर्याय, डिश, वाट्या, पेल्यांची निर्मिती

प्लॅस्टिकला उसाच्या लगद्याचा पर्याय, डिश, वाट्या, पेल्यांची निर्मिती

 राज्य सरकारने प्लॅस्टिक पिशव्यांसह प्लॅस्टिकच्या डिश, वाट्या, पेले यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी आणली आहे. या प्लॅस्टिकला आता उसाच्या लगद्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 04:46 AM2018-08-16T04:46:50+5:302018-08-16T04:47:13+5:30

 राज्य सरकारने प्लॅस्टिक पिशव्यांसह प्लॅस्टिकच्या डिश, वाट्या, पेले यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी आणली आहे. या प्लॅस्टिकला आता उसाच्या लगद्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

Plastic pulse solution, dish, bowls, glasses | प्लॅस्टिकला उसाच्या लगद्याचा पर्याय, डिश, वाट्या, पेल्यांची निर्मिती

प्लॅस्टिकला उसाच्या लगद्याचा पर्याय, डिश, वाट्या, पेल्यांची निर्मिती

मुंबई -  राज्य सरकारने प्लॅस्टिक पिशव्यांसह प्लॅस्टिकच्या डिश, वाट्या, पेले यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी आणली आहे. या प्लॅस्टिकला आता उसाच्या लगद्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यापासून डिश, वाट्या, पेले (एकदा वापरण्याच्या) तयार करणे शक्य झाले आहे. वापरानंतर त्याचे खतात रूपांतरही करता येते.
याबाबत यश पेपर्स लिमिटेड या कंपनीने अशा आगळ्या प्रकारच्या नाशवंत उत्पादनाचे संशोधन सुरू केले आहे. याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वेद कृष्ण यांनी ‘लोकमत’ला सांगितले, उसाच्या लगद्यापासून असे उत्पादन तयार करता येते. या उत्पादनातील मूळ कच्चा माल ऊस असल्याने वापरानंतर ६० दिवसांत त्याचे खतात रूपांतर होऊ शकते. सध्या प्रायोगिक तत्त्वावर अशा उत्पादनांचा पुरवठा ठरावीक दोन कंपन्यांना केला जात आहे. त्याद्वारे महाराष्टÑात मागील वर्षभरात ४०.३८ लाख या प्रकारच्या डिशेस, वाट्या किंवा पेल्यांचा वापरानंतर नाश करण्यात आला आहे. त्याचे खत आता तयार झाले आहे. आता या प्रकारच्या पिशव्यासुद्धा तयार करता येऊ शकतील. त्याचे संशोधन सध्या सुरू आहे.
याखेरीज काही कंपन्यांनीही प्लॅस्टिक बंदीनंतर यावर संशोधन सुरू केले आहे. लवकरच ही उत्पादने किरकोळ ग्राहकांना उपलब्ध होऊ शकणार आहेत. सध्या उत्पादक कंपन्या फार कमी असल्याचे त्याचे दर थोडे महाग आहेत. पण उत्पादकांची संख्या वाढल्यास ही किंमत कमी होऊ शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

संभाव्य किरकोळ किंमत अशी
छोटा पेला : ९५ पैसे
डिशेस : २ ते ७ रुपये
अन्न ठेवण्यासाठीचे
बॉक्स : १४ ते १८ रुपये
चमचा : २ रुपये

Web Title: Plastic pulse solution, dish, bowls, glasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.