Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोलचा तिमाही नीचांक, डिझेलही स्वस्त

पेट्रोलचा तिमाही नीचांक, डिझेलही स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी अनुक्रमे १९ पैसे आणि १७ पैशांची कपात झाली. त्याबरोबर पेट्रोल आता तीन महिन्यांच्या नीचांकावर, तर डिझेल दोन महिन्यांच्या नीचांकावर गेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 01:03 AM2018-11-20T01:03:52+5:302018-11-20T01:04:09+5:30

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी अनुक्रमे १९ पैसे आणि १७ पैशांची कपात झाली. त्याबरोबर पेट्रोल आता तीन महिन्यांच्या नीचांकावर, तर डिझेल दोन महिन्यांच्या नीचांकावर गेले आहे.

 Petrol price down low, diesel is cheaper | पेट्रोलचा तिमाही नीचांक, डिझेलही स्वस्त

पेट्रोलचा तिमाही नीचांक, डिझेलही स्वस्त

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी अनुक्रमे १९ पैसे आणि १७ पैशांची कपात झाली. त्याबरोबर पेट्रोल आता तीन महिन्यांच्या नीचांकावर, तर डिझेल दोन महिन्यांच्या नीचांकावर गेले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील घसरणीमुळे ही दरकपात झाली आहे.
पेट्रोलचे दर आता दिल्लीत ७६.५२ रुपये, मुंबईत ८२.0४ रुपये, चेन्नईत ७९.४६ रुपये आणि कोलकात्यात ७८.४७ रुपये लिटर झाले. डिझेलचे दर दिल्लीत ७१.३९ रुपये, मुंबईत ७४.७९ रुपये, चेन्नईत ७५.४४ रुपये आणि कोलकात्यात ७३.२५ रुपये लिटर झाले.
१६ आॅगस्टला पेट्रोल-डिझेलचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. त्यादिवशी दिल्लीत पेट्रोल ८४ रुपये, तर डिझेल ७५.४५ रुपये लिटर झाले होते. त्यानंतर सरकारने केलेला हस्तक्षेप, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमती व रुपयाची मजबुती यामुळे दरांत घसरण व्हायला सुरुवात झाली. घसरणीचा हा कल अजूनही कायम आहे. डिझेलच्या दरातील घसरण पेट्रोलच्या दराएवढी मोठी मात्र नाही. पेट्रोलचे दर आधीच खूप जास्त असल्यामुळे त्यातील घसरणही मोठी आहे, असे सूत्रांनी सांगितले. कपातीचा कल कायम राहिल्यामुळे पेट्रोलचे दर आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ज्या पातळीवर होते, त्या पातळीवर पोहोचले आहेत. गेल्या चाळीस दिवसांत जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर जवळपास २५ टक्क्यांनी उतरले आहेत.

घसरण किती दिवस?
दरम्यान, घसरणीचा हा कल पुढे कायम राहील का, याबाबत
अनिश्चितता दिसून येत आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्यासाठी सौदी अरेबियाकडून ओपेक देशांवर दबाव वाढण्याची शक्यता
असल्यामुळे आजच कच्च्या तेलाचे दर १ टक्क्याने वाढले आहेत.

Web Title:  Petrol price down low, diesel is cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.