Lokmat Money > बिझनेस न्यूज > तीन राज्यांत पेट्रोल डिझेलपेक्षा स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा, पण महागाई वाढणार

तीन राज्यांत पेट्रोल डिझेलपेक्षा स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा, पण महागाई वाढणार

अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या भावात एक अंकीच फरक राहिला असला, तरी तीन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल डिझेलपेक्षाही स्वस्त झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 12:14 AM2018-11-19T00:14:43+5:302018-11-19T00:15:13+5:30

अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या भावात एक अंकीच फरक राहिला असला, तरी तीन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल डिझेलपेक्षाही स्वस्त झाले आहे.

Petrol is cheaper than diesel in three states; Relief to the masses, but inflation will increase | तीन राज्यांत पेट्रोल डिझेलपेक्षा स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा, पण महागाई वाढणार

तीन राज्यांत पेट्रोल डिझेलपेक्षा स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा, पण महागाई वाढणार

नवी दिल्ली : अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या भावात एक अंकीच फरक राहिला असला, तरी तीन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल डिझेलपेक्षाही स्वस्त झाले आहे. गोवा, गुजरात, ओडिसा आणि अंदमान निकोबार बेटांवर आज डिझेल पेट्रोलपेक्षा महाग आहे. गोव्यामध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा लीटरमागे २ रुपयांनी, तर गुजरात, ओडिसा आणि पोर्ट ब्लेअरवर ते एक रुपयाने महाग आहे. गेल्या वर्षी जूनपासून पेट्रोल व डिझेलचा भाव डायनामिक फ्युएल प्रायसिंग सीस्टिमनुसार निश्चित होत आहेत.
गोवा पेट्रोलवर १२.८६ टक्के तर डिझेलवर १५.०३ टक्के कर आकारत असून, डिझेलवर ती २ टक्के जास्त आहे. यामुळे गोव्यात पेट्रोल ६८.६१ रुपये तर डिझेल ७०.७४ रुपये लीटर आहे. अहमदाबाद आणि सूरतमध्ये डिझेलसाठी तुम्ही पेट्रोलपेक्षा लीटरमागे १ रुपया जास्त मोजता. कारण गुजरातेत व्हॅट ०.०९ टक्के जास्त आहे. पेट्रोलवर गुजरातेत २२.१९ टक्के तर डिझेलवर २२.२८ टक्के कर आहे.
ओडिसात पेट्रोलवर २४.६३ टक्के तर डिझेलवर २५.०८ टक्के कर आकारला जातो. तुम्ही जर भुवनेश्वर किंवा कटकमध्ये पेट्रोल घेतले, तर ते डिझेलपेक्षा १.२ रुपये स्वस्त आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर व्हॅट खूप कमी आहे. तरी तेथे पेट्रोल व डिझेलवर ६ टक्के कर आकारणी होते, तरीही तुम्हाला तेथे डिझेल महाग मिळते. येथे पेट्रोल ६६.४८ रुपये तर डिझेल ६७.३४ रुपये लीटर मिळते.

फरक हळूहळू कमी
सरकारी तेल कंपन्यांनी सात वर्षांपूर्वी पेट्रोल व डिझेलच्या किमतीत लीटरमागे असलेला
३० रुपयांचा फरक हळूहळू
कमी केला.
राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी उच्च विक्री कर आणि व्हॅट लागू केल्यामुळेही डिझेलचे भाव वाढलेले दिसतात.

Web Title: Petrol is cheaper than diesel in three states; Relief to the masses, but inflation will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dieselडिझेल