Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल-डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर

पेट्रोल-डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर

रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी वाढ झाली असून, इंधन दर सार्वकालिक सर्वोच्च पातळीवर गेले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 11:56 PM2018-09-10T23:56:07+5:302018-09-10T23:56:21+5:30

रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी वाढ झाली असून, इंधन दर सार्वकालिक सर्वोच्च पातळीवर गेले आहेत.

Petrol and diesel rates are on an all-time high | पेट्रोल-डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर

पेट्रोल-डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर

नवी दिल्ली : रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी वाढ झाली असून, इंधन दर सार्वकालिक सर्वोच्च पातळीवर गेले आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलचे दर २३ पैशांनी, तर डिझेलचे दर २२ पैशांनी महागले. या दरवाढीविरुद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी देशव्यापी बंद पुकारलेला असतानाच आजची दरवाढ झाली आहे. इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची सरकारची इच्छा नसल्यामुळे दर गगनाला भिडल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
आॅगस्टच्या मध्यापासून पेट्रोलचे दर ३.६५ रुपयांनी, तर डिझेलचे दर ४.0६ रुपयांनी महागले. रुपया प्रचंड घसरल्याने कच्च्या तेलाची आयात महागली आहे. त्यातूनच हे दर भडकल्याचे सूत्रांनी सांगितले. वास्तवात महाग इंधनास सरकारने लादलेले करही जबाबदार आहेत. रिफायनरींच्या दारात वितरण कंपन्यांना पेट्रोल ४0.५0, तर डिझेल ४३ रुपये लिटरला मिळाले. केंद्र पेट्रोलवर प्रतिलिटर १९.४८, तर डिझेलवर १५.३३ रुपयांचे उत्पादन शुल्क आकारते. त्यातच राज्य सरकार व्हॅट लावतात. मुंबईत पेट्रोलवर सर्वाधिक ३९.१२ टक्के व्हॅट आहे. तेलंगणात डिझेलवर सर्वाधिक २६ टक्के व्हॅट आहे. दिल्लीत पेट्रोलवर २७ टक्के, तर डिझेलवर १७.२४ टक्के व्हॅट आहे. नोव्हेंबर २0१४ ते जानेवारी २0१६ या काळात मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ११.७७ रुपये आणि डिझेलवरील शुल्कात १३.४७ रुपये वाढ केली
>दिल्लीत सर्वात कमी
दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ८0.७३ रुपये लिटर, तर डिझेल ७२.८३ रुपये झाले. सर्व महानगरांत दिल्लीत सर्वांत कमी कर असल्याने इंधन स्वस्त आहे.

Web Title: Petrol and diesel rates are on an all-time high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.