Lokmat Money > बिझनेस न्यूज > पतंजली आता कापड उद्योगात; दिवाळीच्या मुहूर्तावर पहिल्या शोरूमचे उद्घाटन

पतंजली आता कापड उद्योगात; दिवाळीच्या मुहूर्तावर पहिल्या शोरूमचे उद्घाटन

योग गुरु बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आता कापड उत्पादन उद्योगामध्ये उतरली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर बाबा रामदेव यांनी 'पतंजली परिधान' या नावाने आपल्या पहिल्या शोरुमचे उद्धाटन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 04:58 PM2018-11-05T16:58:19+5:302018-11-05T17:06:09+5:30

योग गुरु बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आता कापड उत्पादन उद्योगामध्ये उतरली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर बाबा रामदेव यांनी 'पतंजली परिधान' या नावाने आपल्या पहिल्या शोरुमचे उद्धाटन केले.

Patanjali is now in the textile industry; The inauguration of the first showroom on the auspicious occasion of Diwali | पतंजली आता कापड उद्योगात; दिवाळीच्या मुहूर्तावर पहिल्या शोरूमचे उद्घाटन

पतंजली आता कापड उद्योगात; दिवाळीच्या मुहूर्तावर पहिल्या शोरूमचे उद्घाटन

नवी दिल्ली : योग गुरु बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आता कापड उत्पादन उद्योगामध्ये उतरली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर बाबा रामदेव यांनी 'पतंजली परिधान' या नावाने आपल्या पहिल्या शोरुमचे उद्धाटन केले. यावेळी दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेसमध्ये आयोजित उद्धाटन कार्यक्रमात कुस्तीपटू सुशील कुमार, दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.  

येत्या डिसेंबर महिन्यात देशात जवळपास 25 नवीन 'पतंजली परिधान' स्टोअर ओपन करण्यात येणार आहेत. 'पतंजली परिधान'मध्ये भारतीय वेशभूषेसह पश्चिम पोशाख आणि इतर एक्सेसरीज मिळणार आहेत. दिल्लीत ओपन करण्यात आलेल्या 'पतंजली परिधान'मध्ये जीन्स 1100 रुपयांना मिळत आहे. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर 15 टक्कांची सवलत देण्यात आली असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले.


बाबा रामदेव यांच्या प्रवक्त्याने ट्विटरच्या माध्यातून सांगितले की, 'पतंजली परिधान'मध्ये पुरुष, स्त्रिया, लहान मुले, डेनिम, पारंपरिक, कॅज्युअल, फॉर्मल अशा सर्व प्रकारचे 3000 कपड्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये लिवफीट, आस्था आणि संस्कार या ब्रँडचे कपडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्याप्रमाणे खादीने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्त्व केले होते. त्याचप्रमाणे पतंजली देशात आर्थिक स्वातंत्र्य आणेल असे ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Web Title: Patanjali is now in the textile industry; The inauguration of the first showroom on the auspicious occasion of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.