Outsourcing; Seasonal workshops in the new year, more opportunities | नोकरभरतीचेच आउटसोर्सिंग; नव्या वर्षात हंगामी नोक-यांत अधिक संधी

नवी दिल्ली : भारतीय तरुणांना नव्या वर्षात आउटसोर्सिंग आणि हंगामी कार्यपद्धतीतून रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील, असे चित्र समोर येत आहे.
नोकरभरती प्रक्रियेचे आउटसोर्सिंग करण्याचे धोरण कंपन्या स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे. ‘फॉर्च्युन ५00’मधील ज्या कंपन्यांची भारतात ग्लोबल इन-हाउस सेंटर्स आहेत, त्यांना चांगला लाभ झाला आहे. उदा. जगातील चार मोठ्या बँकांनी आपल्या नोकरभरतीची संपूर्ण प्रक्रिया आउटसोर्स केली आहे. नोकरभरती करण्यासाठी जाणकार लोकांचा ताफा बाळगणे हे आता कालबाह्य होत चालले आहे. वाहन, वस्तू उत्पादन, बँकिंग आणि आयटी यासारख्या क्षेत्रातही नोकरभरतीच्या आउटसोर्सिंगचा कल येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, कंपन्या आता नोकरभरती करण्यासाठी एकाच पद्धतीचा जाणकार वर्ग ठेवण्याऐवजी सल्लागार, फ्रिलांसर्स, निवृत्त अधिकारी आॅनलाइन टॅलेंट कम्युनिटीज यांचा संमिश्र गट ठेवणे पसंत करतात, शिवाय हे सारे जण कंपन्यांसाठी हंगामी स्वरूपात काम करतात. केली-ओसीजीने केलेल्या सर्वेक्षणातून असे आढळून आले आहे की, हंगामी मनुष्यबळाने कौशल्यपूर्ण व तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भागविली जात आहे, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६८ टक्के कंपनी अधिकाºयांनी मान्य केले आहे. २0१८ मध्ये कायमस्वरूपी कर्मचाºयांऐवजी हंगामी, लवचिक कार्यव्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे. ७१ टक्के कार्यकारी अधिकाºयांनी सांगितले की, येत्या दोन वर्षांत आम्ही हंगामी कर्मचाºयांची संख्या वाढविणार आहोत. याचाच अर्थ, येत्या वर्षात हंगामी नोकºयांतून अधिक रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
हंगामी कर्मचारी स्वीकारल्यास योग्य वेळी आवश्यक कौशल्ये असलेले मनुष्यबळ न मिळण्याचा धोका संभवतो. या स्थितीत ‘गुणवत्ता पुरवठा साखळी व्यवस्थापन’ महत्त्वाचे ठरते. २0१८ मध्ये या व्यवस्थापन साखळ्या महत्त्वाची भूमिका बजावतील. या व्यवस्थापन संस्था ठरावीक गुणवत्ता असलेल्या लोकांचा डाटा आपल्याकडे ठेवतील व कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार त्याचा पुरवठा करतील. गुणवत्ता पुरवठा साखळी व्यवस्थापन संस्थांतून वेगळा रोजगारही निर्माण होईल.

अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर

नोकरभरतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचाही वापर होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्मवर काम करणारे चॅटबोटस्, व्हिडीओ इंटरव्ह्यू, सोर्सिंग टूल्स आणि पीपल अ‍ॅनॅलिटिक्स या तंत्रज्ञानाचा वापर नोकरभरतीसाठी केला जाऊ शकतो. काही आयटी कंपन्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर सुरूही केला आहे. नोकरभरतीसाठी थर्ड-पार्टी अ‍ॅपचा वापरही या कंपन्या करीत आहेत.
 


Web Title:  Outsourcing; Seasonal workshops in the new year, more opportunities
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.