Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशात एकच अब्जाधीश ! प्राप्तिकर खाते म्हणते, ५०० कोटींवरील वैयक्तिक मिळकत एकाचीच

देशात एकच अब्जाधीश ! प्राप्तिकर खाते म्हणते, ५०० कोटींवरील वैयक्तिक मिळकत एकाचीच

अनेक परदेशी संस्थांमच्या यादीत भारतीय अब्जाधिशांची संख्या भरमसाठ दिसत असली तरी प्राप्तिकर खात्याच्या संख्येनुसार देशात एकच अब्जाधीश आहे. वैयक्तिक मिळकत ५०० कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असलेली देशात केवळ एक आहे. त्या करदात्याची संपत्ती ७२१ कोटी रुपये असल्याची माहिती प्राप्तीकर खात्याकडून जारी करण्यात आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:18 AM2017-12-21T00:18:50+5:302017-12-21T00:19:06+5:30

अनेक परदेशी संस्थांमच्या यादीत भारतीय अब्जाधिशांची संख्या भरमसाठ दिसत असली तरी प्राप्तिकर खात्याच्या संख्येनुसार देशात एकच अब्जाधीश आहे. वैयक्तिक मिळकत ५०० कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असलेली देशात केवळ एक आहे. त्या करदात्याची संपत्ती ७२१ कोटी रुपये असल्याची माहिती प्राप्तीकर खात्याकडून जारी करण्यात आली आहे.

Only a billionaire in the country! The income tax account says only one individual income of 500 crores is available | देशात एकच अब्जाधीश ! प्राप्तिकर खाते म्हणते, ५०० कोटींवरील वैयक्तिक मिळकत एकाचीच

देशात एकच अब्जाधीश ! प्राप्तिकर खाते म्हणते, ५०० कोटींवरील वैयक्तिक मिळकत एकाचीच

मुंबई : अनेक परदेशी संस्थांमच्या यादीत भारतीय अब्जाधिशांची संख्या भरमसाठ दिसत असली तरी प्राप्तिकर खात्याच्या संख्येनुसार देशात एकच अब्जाधीश आहे. वैयक्तिक मिळकत ५०० कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असलेली देशात केवळ एक आहे. त्या करदात्याची संपत्ती ७२१ कोटी रुपये असल्याची माहिती प्राप्तीकर खात्याकडून जारी करण्यात आली आहे.
प्राप्तीकर विभागाने बुधवारी २०१४-१५ वित्तीय वर्ष अर्थात २०१५-१६ मूल्यांकन वर्षातील प्राप्तीकराची आकडेवारी जाहिर केली. त्यानुसार ५०० कोटी रुपयांहून अधिक वैयक्तिक मिळकत असलेल्या करदात्यांची संख्या त्याआधीच्या वर्षी सात होती. त्यांची एकूण मिळकत ८५ हजार १८३ कोटी रुपये होती. १ कोटी रुपयांहून अधिक मिळकत असलेल्या करदात्यांची संख्या २३.५ टक्क्यांनी वाढून ती ५९ हजार ८३० झाली. हाच आकडा आधीच्या वर्षी ४८ हजार ४१७ होता. त्यावर्षी या करदात्यांची एकूण मिळकत २.०५ लाख कोटी रुपये होती. हा आकडा २०१४-१५ आर्थिक वर्षात घसरून १.५४ लाख कोटी झाला.
एकूण करदाते वाढले पण...
२०१४-१५ या आर्थिक वर्षात एकूण करदात्यांची संख्या आधीच्या ३.६५ कोटीहून ४.०७ कोटी झाली. त्याचवेळी अडीच लाख रुपयांहून कमी किंवा शून्य मिळकत दर्शविणाºया करदात्यांची संख्या ८२ लाखाहून १.३७ कोटींवर गेली. या सर्वांची एकूण मिळकत १८.४१ कोटी रुपयांवरुन २१.२७ लाख कोटी रुपयांवर गेली. परतावा भरणाºया ४.०७ कोटी एकूण करदात्यांपैकी सर्वाधिक १.३३ कोटी करदाते हे वार्षिक अडीच ते साडे तीन लाख रुपये मिळकतीच्या श्रेणीत आहेत.
१ ते ५ कोटी रुपयांमधील करदाते ५५,३३१, ५ ते १० कोटी रुपयांमधील ३०२० तर १० ते २५ कोटी रुपये मिळकत असणाºया करदात्यांची संख्या ११५६ आहे. १०० ते ५०० कोटी रुपये मिळकत श्रेणीतील ३१ करदात्यांची एकूण मिळकत ४१७५ कोटी रुपये आहे. हा आकडा त्याआधीच्यावर्षी अनुक्रमे १७ आणि २७६१ कोटी रुपये होता.

Web Title: Only a billionaire in the country! The income tax account says only one individual income of 500 crores is available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.