Lokmat Money > बिझनेस न्यूज > 1 एप्रिलपर्यंत करा हे काम, अन्यथा निष्क्रिय होईल आपलं पॅन कार्ड

1 एप्रिलपर्यंत करा हे काम, अन्यथा निष्क्रिय होईल आपलं पॅन कार्ड

पॅन कार्ड आधार कार्डला अद्यापही लिंक केलेलं नसल्यास आपल्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 09:07 AM2019-01-29T09:07:49+5:302019-01-29T09:08:10+5:30

पॅन कार्ड आधार कार्डला अद्यापही लिंक केलेलं नसल्यास आपल्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

online pan application track pan card invalid if not linked with aadhar | 1 एप्रिलपर्यंत करा हे काम, अन्यथा निष्क्रिय होईल आपलं पॅन कार्ड

1 एप्रिलपर्यंत करा हे काम, अन्यथा निष्क्रिय होईल आपलं पॅन कार्ड

नवी दिल्ली- पॅन कार्ड आधार कार्डला अद्यापही लिंक केलेलं नसल्यास आपल्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आधारला पॅन लिंक न केल्यास आयटी कलम 139 एएअंतर्गत ते निष्क्रिय समजलं जाईल. प्रत्यक्ष कर संचालक मंडळांनी आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची मर्यादा वाढवून 31 मार्च 2019पर्यंत केली आहे.

तसेच एकदा का आपलं आधार कार्ड निष्क्रिय झालं, ऑनलाइन ITR फाइल करता येणार नाही. तसेच कुठूनही येणारा कर परतावाही अडकून पडू शकतो. त्याचबरोबर पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. 

असं करा आधार कार्डला पॅन कार्ड लिंक
पहिल्यांदा आपण गुगल क्रोम ब्राऊझरवरून प्राप्तिकर विभागाची ई-फायलिंग वेबसाइट (www.incometaxindiaefiling.gov.in) ला भेट द्या. वेबसाइटला भेट दिल्यानंतर डाव्या बाजूला दिला गेल्ल्या लाल रंगाच्या लिंक आधार या टॅबवर क्लिक करा. जर आपलं खात नसल्यास नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर एक पेज खुल होईल. त्यावर निळ्या अक्षरात दिलेल्या टॅबवर क्लिक करून प्रोफाइल सेटिंग निवडा. तिथे दिलेल्या सेक्शनमध्ये तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.

सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या लिंक आधार टॅबवर क्लिक करा. तसेच मोबाईलच्या माध्यमातूनही आपण आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करू शकतो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं त्यासाठी 567678 किंवा 56161 हे दोन नंबर उपलब्ध करून दिले आहेत. या नंबरवर एसएमएस करून आपण आधारला पॅन कार्ड लिंक करू शकता. 

Web Title: online pan application track pan card invalid if not linked with aadhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.