Lokmat Money > बिझनेस न्यूज > कुटीर उत्पादनांसाठी ‘आॅनलाइन’ बाजारपेठ, अमॅझॉनशी करार

कुटीर उत्पादनांसाठी ‘आॅनलाइन’ बाजारपेठ, अमॅझॉनशी करार

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या कुटीर उद्योग महामंडळांशी संलग्न असलेल्या उद्योगांच्या उत्पादनांसाठी ‘आॅनलाइन’ बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. याअंतर्गत केंद्रीय कुटीर उद्योग एम्पोरिअमने (सीसीआयई) अलीकडेच ‘अमॅझॉन’शी करार केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:23 AM2018-03-07T01:23:09+5:302018-03-07T01:23:09+5:30

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या कुटीर उद्योग महामंडळांशी संलग्न असलेल्या उद्योगांच्या उत्पादनांसाठी ‘आॅनलाइन’ बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. याअंतर्गत केंद्रीय कुटीर उद्योग एम्पोरिअमने (सीसीआयई) अलीकडेच ‘अमॅझॉन’शी करार केला.

 The 'online' market for cottage products, the deal with Amjon | कुटीर उत्पादनांसाठी ‘आॅनलाइन’ बाजारपेठ, अमॅझॉनशी करार

कुटीर उत्पादनांसाठी ‘आॅनलाइन’ बाजारपेठ, अमॅझॉनशी करार

मुंबई -  केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या कुटीर उद्योग महामंडळांशी संलग्न असलेल्या उद्योगांच्या उत्पादनांसाठी ‘आॅनलाइन’ बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. याअंतर्गत केंद्रीय कुटीर उद्योग एम्पोरिअमने (सीसीआयई) अलीकडेच ‘अमॅझॉन’शी करार केला.
सीसीआयईद्वारे ग्रामीण भागातील कारागीर व विणकर यांच्या उत्पादनांची विक्री केली जाते. आता अमॅझॉनशी केलेल्या करारामुळे ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या सिल्क व खादीच्या साड्या, चादरी, धातूच्या वस्तू व अन्य हस्तकलेची उत्पादने या माध्यमातून लाखो ग्राहकांना खरेदी करता येतील. यातून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळू शकणार आहे. भारतीय हस्तकला व हातमागाच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. मात्र आजवर या उत्पादनांना हवी तशी बाजारपेठ उपलब्ध होत नव्हती. आता ही उत्पादने एकाचवेळी असंख्य ग्राहकांपर्यंत पोहोचत
आहेत, असे मत सीसीआयईचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद नागपाल यांनी व्यक्त केले. हा केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देणारा एक भाग असल्याचे मत अमॅझॉन इंडियाचे संचालक गोपाळ पिल्लई यांनी व्यक्त केले.

Web Title:  The 'online' market for cottage products, the deal with Amjon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.