Lokmat Money > बिझनेस न्यूज > ओला, उबरच्या वेतनात ३३% कपात, कंपनीचा नफा वाढविण्यासाठी चालकांवर गंडांतर

ओला, उबरच्या वेतनात ३३% कपात, कंपनीचा नफा वाढविण्यासाठी चालकांवर गंडांतर

ओला आणि उबर या बहुराष्ट्रीय टॅक्सी वाहतूक कंपन्यांनी खर्च आणि सबसिडीत मोठी कपात केल्यामुळे या कंपन्यांच्या चालकांच्या वेतनात गेल्या वर्षभरात तब्बल ३३ टक्क्यांची कपात झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:26 AM2017-09-19T01:26:26+5:302017-09-19T01:26:29+5:30

ओला आणि उबर या बहुराष्ट्रीय टॅक्सी वाहतूक कंपन्यांनी खर्च आणि सबसिडीत मोठी कपात केल्यामुळे या कंपन्यांच्या चालकांच्या वेतनात गेल्या वर्षभरात तब्बल ३३ टक्क्यांची कपात झाली आहे.

Oblique, 33% reduction in recovering wages, wind turbine to increase company profits | ओला, उबरच्या वेतनात ३३% कपात, कंपनीचा नफा वाढविण्यासाठी चालकांवर गंडांतर

ओला, उबरच्या वेतनात ३३% कपात, कंपनीचा नफा वाढविण्यासाठी चालकांवर गंडांतर

बंगळूर : ओला आणि उबर या बहुराष्ट्रीय टॅक्सी वाहतूक कंपन्यांनी खर्च आणि सबसिडीत मोठी कपात केल्यामुळे या कंपन्यांच्या चालकांच्या वेतनात गेल्या वर्षभरात तब्बल ३३ टक्क्यांची कपात झाली आहे. चालकांना मिळणा-या प्रोत्साहन लाभांतही (इन्सेंटिव्ह) ६० टक्क्यांची कपात झाली असून, त्यांच्या वाहनांचे हप्ते वगळून त्यांचे २०१७ च्या दुस-या तिमाहीतील मासिक उत्पन्न २१ हजारांपर्यंत खाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ते ३१ हजार ते ३२ हजार रुपये होते.
संशोधन संस्था रेड सिअरने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार चालकांना देण्यात येणा-या प्रोत्साहन लाभामुळे गेल्या काही वर्षांत ओला आणि उबर यांना झटपट टॅक्सी सेवा पुरविण्यात मोठे यश आले होते. तथापि, यावरील कंपन्यांचा खर्चही मोठा होता. आता चालकांच्या प्रोत्साहन लाभात ६० टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे. दोन्ही कंपन्यांनी आपले नफ्याचे प्रमाण वाढविल्यामुळे चालकांच्या लाभात घसरण झाली आहे.
अहवालात म्हटले आहे की, टॅक्सीचालकांकडून प्रचंड विरोध होत असतानाही ओला आणि उबर या कंपन्यांनी बंगळुरू आणि दिल्ली येथील टॅक्सी सेवा व्यवसायातील स्वत:चे नफ्याचे प्रमाण वाढविले आहे. त्याचा परिणाम म्हणून २०१७ च्या दुसºया तिमाहीत टॅक्सीचालकांना देण्यात येणा-या प्रोत्साहन लाभात मोठी कपात झाली आहे. चालकांच्या घरी घेऊन जायच्या (टेक होम) उत्पन्नात ३३ टक्के घट झाली आहे. देशातील चालकांचे सरासरी मासिक उत्पन्न २० हजार रुपये आहे. तथापि, ओला आणि उबरसाठी काम करणारे चालक ३० हजार ते ४० हजार रुपये कमावीत होते. प्रोत्साहन लाभामुळे अनेक चालक महिन्याला १ लाख रुपयांपर्यंत उत्पन्नही कमावीत होते. तथापि, हे दिवस आता संपले आहेत. 
> गाड्यांचे हप्ते थकले
उत्पन्न कमी होताच ओला आणि उबरसाठी काम करणा-या चालकांच्या वाहनांचे हप्ते थकू लागले आहेत. अनेक बँकांनी या कंपन्यांसाठी काम करणा-या चालकांना नवे कर्ज देणे बंद केले आहे.

Web Title: Oblique, 33% reduction in recovering wages, wind turbine to increase company profits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.