Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतातील बी-टू-बी तंत्रज्ञान स्टार्टअपची संख्या तब्बल तिपटीने वाढून ३,२०० वर, एका अहवालातील माहिती

भारतातील बी-टू-बी तंत्रज्ञान स्टार्टअपची संख्या तब्बल तिपटीने वाढून ३,२०० वर, एका अहवालातील माहिती

फ्लिपकार्ट, ओला, ओयो आणि स्विगी यासारख्या तंत्रज्ञानावर आधारित किरकोळ विक्री क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत लक्ष वेधून घेतले आहे. २०१४ ते २०१८ या काळात या बिझनेस टू बिझनेस (बी-टू-बी) श्रेणीतील स्टार्टअपची संख्या तिपटीने वाढून ९०० वरून ३,२०० झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 04:06 AM2019-05-09T04:06:42+5:302019-05-09T04:07:30+5:30

फ्लिपकार्ट, ओला, ओयो आणि स्विगी यासारख्या तंत्रज्ञानावर आधारित किरकोळ विक्री क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत लक्ष वेधून घेतले आहे. २०१४ ते २०१८ या काळात या बिझनेस टू बिझनेस (बी-टू-बी) श्रेणीतील स्टार्टअपची संख्या तिपटीने वाढून ९०० वरून ३,२०० झाली आहे.

The number of B-to-B technology startups in India increased by three times to 3,200; | भारतातील बी-टू-बी तंत्रज्ञान स्टार्टअपची संख्या तब्बल तिपटीने वाढून ३,२०० वर, एका अहवालातील माहिती

भारतातील बी-टू-बी तंत्रज्ञान स्टार्टअपची संख्या तब्बल तिपटीने वाढून ३,२०० वर, एका अहवालातील माहिती

बंगळुरू : फ्लिपकार्ट, ओला, ओयो आणि स्विगी यासारख्या तंत्रज्ञानावर आधारित किरकोळ विक्री क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत लक्ष वेधून घेतले आहे. २०१४ ते २०१८ या काळात या बिझनेस टू बिझनेस (बी-टू-बी) श्रेणीतील स्टार्टअपची संख्या तिपटीने वाढून ९०० वरून ३,२०० झाली आहे.
व्यवस्थापन कंपनी नेटअ‍ॅप आणि कन्सल्टिंग संस्था झिनोव्ह यांनी केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. एकूण तंत्रज्ञान स्टार्टअपमध्ये बी-टू-बी स्टार्टअपचे प्रमाण २०१४ मध्ये २९ टक्के होते. ते गेल्या वर्षी वाढून ४३ टक्के झाले. यापैकी किमान पाच स्टार्टअप कंपन्यांना युनिकॉर्न दर्जा प्राप्त झाला आहे. १ अब्ज डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त मूल्य असलेल्या खाजगी कंपनीला युनिकॉर्न दर्जा मिळतो. असा दर्जा मिळालेल्या कंपन्यांत इनमोबी, फ्रेशवर्क्स, उडान, बिलडेक्स आणि डेल्हिवरी यांचा समावेश आहे. पाईन लॅब्ज, द्रुव, ग्रेआॅरेंज, रिव्हिगो आणि लेंडिंगकार्ट या स्टार्टअप कंपन्यांना लवकरच हा दर्जा मिळण्याची अपेक्षा आहे. फंडिंग बी-टू-बी स्टार्टअप कंपन्या ३६४ टक्क्यांनी विस्तारल्या आहेत. या कंपन्यांचे मूल्य आता ३.७ अब्ज डॉलरवर गेले आहे.
झिनोव्हच्या सीईओ परी नटराजन यांनी सांगितले की, भारतात तंत्रज्ञान उद्योगास आता जेवढा चांगला काळ आहे, तेवढा याआधी कधीच नव्हता. बी-टू-बी स्टार्टअप कंपन्यांच्या संख्येत झपाट्याने झालेली वाढ हेच
दर्शविते.
 

Web Title: The number of B-to-B technology startups in India increased by three times to 3,200;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.