Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता गॅसही महागणार?, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता

आता गॅसही महागणार?, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 04:53 AM2018-09-22T04:53:19+5:302018-09-22T04:53:29+5:30

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ लागला आहे.

Now gas prices will rise, CNG, PNG prices are likely to increase | आता गॅसही महागणार?, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता

आता गॅसही महागणार?, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ लागला आहे. पेट्रोल व डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीनंतर वाहनांसाठी लागणारा गॅस सीएनजी व घरगुती वापराचा गॅस (पीएनजी) यांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गॅसची किंमत आॅक्टोबरमध्ये वाढवण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. याचाच अर्थ सणासुदीच्या काळात गॅससाठी जादा पैसे मोजावे लागतील.
पेट्रोल व डिझेलपेक्षा सीएनजी स्वस्त असल्याने गेल्या काही वर्षांत अधिकाधिक लोक सीएनजीवर चालणाºया कार विकत घेत आहेत. काही शहरांत टॅक्सी व रिक्षाही सीएनजीवर चालतात. अशा स्थितीत सीएनजी महागल्यास टॅक्सी व रिक्षाचालक दरवाढीची मागणी करू शकतील.
अमेरिका, कॅनडा, ब्रिटन व रशियातील सरासरी दराच्या आधारे दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या किमती निश्चित केल्या जातात. आता आॅक्टोबरमध्ये त्या ठरवण्यात येणार आहेत. गेल्या महिनाभरात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याचा फटका ग्राहकांना बसू शकेल, नैसर्गिक वायूची किंमत डॉलरमध्ये असते. सीएनजी व पीएनजी गॅस वितरकांसाठी गॅसची किंमत वाढली आहे. त्यामुळे आता दरवाढीचा फटका सीएनजी व पीएनजी ग्राहकांना बसणार आहे.
>पेट्रोल महागच
तेल कंपन्यांनी गेल्या दोन दिवसांत डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. पेट्रोलचे दरही १0 पैशांनीच वाढवले आहेत.
त्याआधी बुधवारी कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती.
त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर राहतील, असे वाटू लागले असतानाच गॅस महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Now gas prices will rise, CNG, PNG prices are likely to increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.