नवी दिल्ली : नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांच्या अध्यक्षतेखालील रोजगाराची माहिती गोळा करण्याचे काम दिलेला टास्कफोर्स, आपल्या शिफारशींना पुढील आठवड्यात अंतिम रूप देण्याची शक्यता आहे. ही माहिती श्रम सचिव एम. सत्यवती यांनी शनिवारी येथे दिली.
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) धोरण आखण्यासाठी रोजगाराची विश्वसनीय आणि वेळेत माहिती मिळण्यासाठी उपाययोजना सूचविण्यास गेल्या महिन्यात हा टास्कफोर्स स्थापन केला होता. विश्वसनीय माहितीच्या आधारे रोजगाराबाबत धोरणांना निश्चित स्वरूप देता यावे, म्हणून हे काम
वेगाने पूर्ण करण्याचे आदेश पीएमओने दिले होते.
टास्कफोर्स आपल्या शिफारशी पुढील आठवड्यात पूर्ण करील, असे अधिकाऱ्याने सांगितले.