Lokmat Money > बिझनेस न्यूज > कौशल्यवाढीसाठी नव्या संधी

कौशल्यवाढीसाठी नव्या संधी

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) व इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, आता तांत्रिक व व्यावसायिक कंपन्यांच्या साह्याने अभ्यासक्रम तयार करणार आहेत, तसेच पंतप्रधानांच्या स्किल इंडिया मोहिमेखाली सुरू केले जाणारे हे अभ्यासक्रम संबंधित उद्योगांच्या गरजेनुसार तयार केले जातील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:07 AM2018-03-06T01:07:01+5:302018-03-06T01:07:01+5:30

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) व इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, आता तांत्रिक व व्यावसायिक कंपन्यांच्या साह्याने अभ्यासक्रम तयार करणार आहेत, तसेच पंतप्रधानांच्या स्किल इंडिया मोहिमेखाली सुरू केले जाणारे हे अभ्यासक्रम संबंधित उद्योगांच्या गरजेनुसार तयार केले जातील.

 New opportunities for skill development | कौशल्यवाढीसाठी नव्या संधी

कौशल्यवाढीसाठी नव्या संधी

- संतोष ठाकूर  
नवी दिल्ली -  इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) व इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, आता तांत्रिक व व्यावसायिक कंपन्यांच्या साह्याने अभ्यासक्रम तयार करणार आहेत, तसेच पंतप्रधानांच्या स्किल इंडिया मोहिमेखाली सुरू केले जाणारे हे अभ्यासक्रम संबंधित उद्योगांच्या गरजेनुसार तयार केले जातील. रेल्वे, पेट्रोलियम, ऊर्जा, जहाज वाहतूक, वाहतूक क्षेत्रांचीही त्यासाठी मदत घेतली जाईल आणि त्यांच्या अधिकाºयांचे कौशल्य वाढविण्यासाठी मदत केली जाईल. सरकारी कंपनीत आल्यानंतर मिड करिअर पायरीवर अधिकाºयांच्या कौशल्याला आणखी संधी मिळेल, असे अभ्यासक्रम नसतात. यासाठी सरकारने आयआयटी व आयआयएमला सांगितले आहे की, अशा अधिकाºयांच्या कौशल्याला आणखी वाव मिळण्यासाठी तुम्ही भूमिका बजावावी.
नुकत्याच झालेल्या परिषदेत मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सरकारी व खासगी क्षेत्रातील तांत्रिक व व्यावसायिक कंपन्यांना घेऊन, त्या अभ्यासक्रम सुरू करण्याचे आयआयएम व आयआयटींना सुचविले होते. त्यांनी या कंपन्यांच्या प्रांगणात एक्स्टेंशन क्लासही सुरू करण्याचा सल्ला दिला होता. त्या कंपन्यांमध्ये काम करणाºया व्यावसायिकांना आयआयटी, आयआयएमबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन (आयआयडी), आयआयआयएसमध्ये जाऊन अभ्यास करणे अडचणींचे ठरते. एक्स्टेंशन क्लासमुळे त्यांची सोय होईल.
शहरी विकास खात्यातील अधिकारी म्हणाला की, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी प्रजासत्ताक दिनाची तयारी करतो. तो दरवर्षी सगळ्या सीस्टिम लावतो व त्यानंतर तेथून काढून घेतो.
यात ४ ते ५ महिने खर्च होतात. हा वेळ लक्षात घेऊन, आयआयडीसोबत सीपीडब्ल्यूडीचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी खास अभ्यासक्रम तयार केला जावा, असे ठरले आहे.
 

Web Title:  New opportunities for skill development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.