Lokmat Money > बिझनेस न्यूज > नव्या अ‍ॅपने अंधही ओळखणार नोटा

नव्या अ‍ॅपने अंधही ओळखणार नोटा

अंध नागरिकांना नोटांची ओळख व्हावी यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक एक मोबाईल अ‍ॅप घेऊन येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:09 AM2019-07-15T04:09:06+5:302019-07-15T04:09:14+5:30

अंध नागरिकांना नोटांची ओळख व्हावी यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक एक मोबाईल अ‍ॅप घेऊन येत आहे.

New app knows the blindness | नव्या अ‍ॅपने अंधही ओळखणार नोटा

नव्या अ‍ॅपने अंधही ओळखणार नोटा

नवी दिल्ली : अंध नागरिकांना नोटांची ओळख व्हावी यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक एक मोबाईल अ‍ॅप घेऊन येत आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीत आजही नगदीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आहेत.
आरबीआयने म्हटले आहे की, नेत्रहीन लोकांसाठी नगदी आधारित देवाण-घेवाण यशस्वी बनविण्यासाठी नोटांची ओळख होणे आवश्यक आहे. नोटांची ओळख होण्यासाठी नेत्रहीन लोकांसाठी ‘इंटाग्लियो प्रिंटिंग’ आधारित ओळख चिन्ह देण्यात आले आहे. मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यासाठी बँक विक्रेत्याचा शोध घेत आहे. हे अ‍ॅप महात्मा गांधींजींच्या छायाचित्रांच्या जुन्या आणि नवीन सिरीजच्या नोटा ओळखण्यात सक्षम असेल. देशभरात ८० लाख नेत्रहीन लोक आहेत. आरबीआयच्या या निर्णयाने या लोकांना नोटा ओळखण्यासाठी या अ‍ॅपचा खूपच उपयोग होणार आहे.
>अशी ओळखता येईल नोट
हे अ‍ॅप नेमके कसे काम करील? याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, नोटांची ओळख निश्चित करण्यासाठी कॅमेऱ्यासमोर नोट ठेवून तिचा फोटो घ्यावा लागेल. जर नोटाचा फोटो योग्य पद्धतीने आला, तर हे अ‍ॅप आॅडिओ नोटिफिकेशनच्या माध्यमातून अंध व्यक्तीला नोटाचे मूल्य सांगेन. जर, नोटाचा फोटो योग्य पद्धतीने आला नाही तर हे अ‍ॅप पुन्हा प्रयत्न करण्यास सांगेन.

Web Title: New app knows the blindness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.