Lokmat Money > बिझनेस न्यूज > एक प्रमोशन अन् पगार दुप्पट; यांच्या पगाराचा आकडा पाहून उडाल

एक प्रमोशन अन् पगार दुप्पट; यांच्या पगाराचा आकडा पाहून उडाल

टाटा समूहाच्या चेअरमनचा पगार पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 11:16 AM2018-10-22T11:16:23+5:302018-10-22T11:17:31+5:30

टाटा समूहाच्या चेअरमनचा पगार पाहून थक्क व्हाल

Natarajan Chandrasekarans salary almost doubles in leap from TCS to Tata Sons | एक प्रमोशन अन् पगार दुप्पट; यांच्या पगाराचा आकडा पाहून उडाल

एक प्रमोशन अन् पगार दुप्पट; यांच्या पगाराचा आकडा पाहून उडाल

मुंबई: टाटा कन्स्टल्टन्सी सर्विसमधून टाटा समूहाच्या होल्डिंग कंपनीत रुजू झालेल्या एन. चंद्रशेखरन यांचा पगार दुप्पट झाला आहे. टाटा सन्सचे चेयरमन असलेल्या 56 वर्षीय चंद्रशेखरन यांचा पगार 55.11 कोटी रुपये इतका आहे. यातील 85 टक्के रक्कम कमिशन आणि फायद्यातील टक्केवारीच्या हिशोबानं दिली जाईल. टाटा सन्सच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत अनेक वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या टाटा समूहाच्या चेअरमनपदाची धुरा गेल्या फेब्रुवारीत चंद्रशेखर यांच्याकडे आली. त्याआधी 11 महिने ते टीसीएसचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांचं पॅकेज 30.15 कोटी रुपये होतं. आता ते जवळपास दुप्पट झालं आहे. टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या तुलनेत चंद्रशेखरन यांचा पगार तिप्पट आहे. मिस्त्री यांना ऑक्टोबर 2016 मध्ये टाटा सन्सच्या बोर्डवरुन हटवण्यात आलं. त्यावेळी त्यांचं पॅकेज 16 कोटी रुपये होतं. 

चंद्रशेखरन यांच्या रुपात पहिल्यांदाच एका बिगरपारसी व्यक्तीकडे टाटा समूहाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. चंद्रशेखरन यांचे सर्व भागधारकांशी उत्तम संबंध असल्याची माहिती टाटा समूहातील अधिकाऱ्यांनी दिली. सध्या टाटा समूहाकडून व्यवसायाची पुनर्रचना केली जात आहे. उड्डाण आणि संरक्षण क्षेत्रात विस्तार करण्याचा समूहाचा प्रयत्न आहे. याशिवाय टाटा समूहाचं बलस्थान असलेल्या स्टील उद्योगाची क्षमता वाढवण्यासाठीदेखील पावलं उचलली जात आहेत. याशिवाय विस्ताराची फारशी संधी नसलेले बरेच उद्योग बंद केले जाणार आहेत. 
 

Web Title: Natarajan Chandrasekarans salary almost doubles in leap from TCS to Tata Sons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.